खटाव:-मायणीच्या सिद्धनाथाचा रथोत्सव उत्साहात.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मायणीच्या सिद्धनाथाचा रथोत्सव उत्साहात.
मायणी प्रतिनिधी___सिद्धनाथाच्या नावाने चांगभलेचा गजर करीत हजारो भाविकांच्या उपस्थित मायणी चा रथोत्सव उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला येथील रिगावनग्रामदैवत श्री सिद्धनाथाच्या यात्रेनिमित्त आयोजित रथोत्सवाला भाविकांनी गर्दी केली होती कोरोना नंतर प्रथमच रथोत्सव असल्याने नागरिकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता सकाळी साडेअकराच्या दरम्यान जि प सदस्य सुरेंद्र गुदगे तसेच सुरज पाटील अभय देशमुख या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रथपूजन होऊन रथ ओढण्यास सुरुवात झाली रथोत्सवानिमित्त वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती रथ हळूहळू पुढे सरकत असताना भाविक नाथाच्या ऋणातून मुक्तहोण्यासाठी मनोभावे नोटांच्या माळा व नारळाची तोरणे बांधत होती रथावर माता टेकवून गुलाल उधळीत होते मंदिरापासून सुरू झालेली यात्रा चावडी मुख्य मार्गाने नवी पेठ शिंदेवाडी फाटा प्राथमिक शाळा फुलेनगर विटा रोडने चांदणी चौकतसायंकाळी आल्यावर एकच गर्दी वाढली यावेळी पुण्या मुंबईवरून आलेल्या लोकांनी दर्शनासाठी रांग लावली होती परिसरात पूजा साहित्य मेवा मिठाईची दुकाने थाटली होतीग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रथोत्सव शांततेने पार पाडण्यासाठी पोलीस प्रमुख मालोजीराव देशमुख शितल पालेकर व अन्य कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता रथावर डॉक्टर विकास देशमुख अभय देशमुख सुशांत देशमुख दिसत आहेत