ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे पिंपरी:-हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त रविवारी मौलाना अहमद नक्शबंदी यांचे मार्गदर्शन : युसुफ कुरेशी.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त रविवारी मौलाना
अहमद नक्शबंदी यांचे मार्गदर्शन : युसुफ कुरेशी
पिंपरी, दि.8 (शफिक शेख) :- हजरत महंमद पैगंबर साहेब यांचा १४४५ वा जयंती उत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त रविवारी (दि.९) सायंकाळी सात वाजता पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे आयोजित केलेल्या सभेत अहमदाबादचे ज्येष्ठ मौलाना अहमद नक्शबंदी आणि पिंपरी चिंचवड मधील मौलाना मार्गदर्शन करणार आहेत. या उत्सवात नागरिकांनी उस्फूर्त सहभागी व्हावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड जुलूस कमिटीचे अध्यक्ष युसुफ कुरेशी यांनी केले आहे.
युसुफ कुरेशी यांनी सांगितले की, जुलूस मध्ये सहभागी होण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पाच विभागातून मिरवणुका निघणार आहेत. यामध्ये दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी विभाग; काळा खडक, वाकड, काळेवाडी, पिंपरी कॅम्प विभाग; निगडी आकुर्डी चिंचवड विभाग; कुदळवाडी, जाधववाडी, घरकुल विभाग; भोसरी दिघी, बालाजी नगर, नेहरूनगर विभाग या परिसरातील नागरिकांसह शहरातील ७० ते ८० मुस्लिम युवक मंडळाचे पदाधिकारी, सभासद सहभागी होणार आहेत.
सभेच्या स्थळी महिला व मुलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था केलेली आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे धार्मिक उत्सव साजरे करण्यात आले नाही. यावर्षी सरकारने परवानगी दिल्यामुळे जुलूस मध्ये शांततेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष युसुफ कुरेशी यांनी केले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button