ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे चिंचवड:-पुणे-मुंबई महामार्गावर नादुरूस्त पाईपलाईन आणि खराब रस्त्यामुळे वाहनचालकांचे जीवन धोक्यात.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

पुणे-मुंबई महामार्गावर नादुरूस्त पाईपलाईन आणि
खराब रस्त्यामुळे वाहनचालकांचे जीवन धोक्यात.
चिंचवड, दि. 20 (शफिक शेख) :- पुणे – मुंबई महामार्गावर चिंचवड रेल्वेस्टेशन चौकात नादुरूस्त पाण्याची पाईपलाईन आणि खराब रस्त्यामुळे महामार्गावरील वाहनचालकांना आपले जीवन धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, पुणे-मुंबई महामार्गावरील चिंचवड स्टेशन चौकात, विकी वाईन्स दुकानासमोरून गेलेली एक पाण्याची पाईपलाईन गेल्या एक महिन्यापासून नादुरूस्त अवस्थेत आहे. त्यामुळे हजारो लीटर पाणी वाहून महामार्गावर पाणीच पाणी झाले आहे. त्यातूनच पदपथावरील तुटलेल्या ब्लॉक्समध्ये ते पाणी जावून तो पूर्ण रस्ताच खराब झाला आहे. अनेकवेळा नागरिकांनी तक्रारी देवूनसुद्धा महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून आणि खराब रस्त्यासाठीही संबंधित विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. नागरिकांना आणि वाहनचालकांना अशाच प्रकारे आपला जीव मुठीत घेवून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. तरी माननीय आयुक्त शेखर सिंग यांनी या बाबीचा गांभिर्याने विचार करून त्वरित या दोन्ही समस्यांवर तोडगा काढण्याचे आदेश संबंधित विभागांना द्यावेत, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button