राहाता तालुक्यातील तिसगाव येथील प्रगतशील शेतकरी रावसाहेब केशव कडू यांचे वृद्धापकाळाने निधन.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS
राहाता तालुक्यातील तिसगाव येथील प्रगतशील शेतकरी रावसाहेब केशव कडू यांचे वृद्धापकाळाने निधन.
राहाता तालुक्यातील तिसगाव येथील प्रगतशील शेतकरी रावसाहेब केशव कडू यांचे मंगळवार दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 1.45 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले . मृत्यू समयी ते 87 वर्षाचे होते.
तिसगाव (प्रवर) येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी 6.00 वाजता नमस्कार करण्यात आले. परिसरातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
त्यांचा दशक्रिया विधी
गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8.30 मिनिटांनी होणार आहे.
सदर प्रसंगी ह. भ .प. संदीप महाराज चेचरे यांचे प्रवचन
*तेरावा विधी*
रविवार 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10.00
*शोकाकुल*
त्यांच्या मागे
ग भा सखुबाई रावसाहेब पाटील कडू (पत्नी)
अण्णासाहेब रावसाहेब कडू (मुलगा )
रवींद्र रावसाहेब कडू ( मुलगा)
अरुण रावसाहेब कडू (मुलगा)
सौ शांताताई रामराव पा कवडे (मुलगी)
सौ उज्वलाताई प्रकाशराव पा विखे (मुलगी)
सौ शोभाताई अनिल राव पा खर्डे (मुलगी)
तसेच मोठा परिवार आहे.
कै रावसाहेब केशव कडू यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एक यशस्वी प्रगतशील शेतकरी म्हणून नावलौकिक मिळविला. मनमिळाऊ व धार्मिक स्वभावामुळे त्यांनी समाजात आदराचे स्थान मिळविले होते. त्यांच्या मागे त्यांच्या निधनामुळे प्रवरा परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांना सर्वत्र भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.