शिर्डी :-शिर्डीजवळील लग्नात अन्नातुन दीडशे जणांना विषबाधा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
शिर्डीजवळील लग्नात अन्नातुन दीडशे जणांना विषबाधा.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्यूज प्रतिनिधी ) शिर्डी येथुन जवळच काल रविवारी संपन्न झालेल्या एका विवाह सोहळ्यातील जवळपास दीडशे लोकांना अन्नातून विषबाधा झाली असुन यात वधु पित्याचाही समावेश आहे . या सर्वांवर सुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत .
शिर्डो नजीक रविवारी दुपारी वैदिक पद्धतीने विवाह संपन्न झाला तर सायं काळी मोठ्या थाटामाटात या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . या विवाह सोहळ्यासाठी दोन्ही बाजूचे अनेक वन्हाडी तसेच नागरिक उपस्थित होते . भोजन केल्यानंतर दहा ते पंधरा जणांना पोटदुखी व उलट्या होण्याचा त्रास जाणू लागला होता तर रात्री आठ वाजे नंतर जवळपास दीडशेहून अधिक व्याक्तीना उलट्या . जुलाब व पोट दुखीचा मोठ्या प्रमाणात त्रास झाल्याने अनेकांनी उपचार घेण्याकरिता हॉस्पिटलकडे धाव घेतली . वधु पित्याला देखील पोटदुखी व उलट्यांचा त्रास झाला . विवाह सोहळ्यात येणार्या नागरिकांना अचानक त्रास जाणू लागल्याने नातेवाईक व आयोजकांनी त्यांना तात्काळ उपचारांसाठी दाखल केले . रात्री उशिरापर्यंत विषबाधा झालेल्या नागरिक साईनाथ रुग्णालयात तसेच साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्याकरिता येत होते साईबाबा रुग्णालयात जवळपास पस्तीस तर साईनाथ रुगणालयात अंदाजे शंभरहुन आधिक व्यक्तीना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . तसेच काही खाजगी रुग्णालयात उपवैधकीय संचालक डॉ प्रीतम वडगावे यांनी सांगितले . यातील एकजण अतिदक्षता विभागात असुन अन्य रुग्ण समान्य विभागात आहेत . विषबाधा झाल्याने विवाह सोहळ्यात एकच धावपळ उडाली असुन रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली