वाईत ‘फार्मर कप स्पर्धा’ कार्यशाळा संपन्न.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाईत ‘फार्मर कप स्पर्धा’ कार्यशाळा संपन्न.

वाई:दिनांक २८ नोव्हेंबर २०२५
तालुका कृषी अधिकारी, वाई व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सहाय्यक कृषि अधिकारी व शेतकरी यांचे एक दिवसीय प्रशिक्षण देशभक्त किसनवीर सभागृह, पंचायत समिती वाई येथे उत्साहात संपन्न झाले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना गटविकास अधिकारी वाई विजयकुमार परिट यांनी पंचायत समिती, कृषि विभाग व पाणी फाउंडेशन या सर्वांचा केंद्रबिंदू शेतकरी आहे त्यासाठी कृषि विभाग व पाणी फाउंडेशन यांनी ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा-2026’ च्या माध्यमातून हातात-हात घालून काम केल्यास शेतकऱ्याचे उत्पादन वाढण्यास निश्चित मदत होणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका कृषि अधिकारी वाई हरिश्चंद्र धुमाळ यांनी केले. मास्टर ट्रेनर मयुर साळुंखे यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पाणी फाउंडेशन चा प्रवास,कृषी विभाग आणि पानी फाऊंडेशनचे संयुक्त कामकाज याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षक अपूर्वा भारमल यांनी फार्मर कप स्पर्धा नियम,अटी व नोंदणी प्रक्रिया समजावुन सांगितली.
प्रशिक्षणादरम्यान मंडल कृषि अधिकारी भुईंज निखिल रायकर यांनी महाविस्तार ॲप विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी शांताराम गोळे, वाईचे मंडळ कृषी अधिकारी रवींद्र बेलदार, कृषी विस्तार अधिकारी भालेराव, समन्वयक कोमल देशमुख यांच्यासह कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आत्माचे एटीएम योगेश जायकर, सूत्रसंचालन कृषी सेवक दिशा बांबळे व आभार प्रदर्शन कृषी सेवक प्रविण नाळे यांनी केले.




