क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे पिंपरी:-कडक पोलिस आयुक्तांची कडक शिस्त गैरवर्तणूक प्रकरणी तीन पोलिस कर्मचारी निलंबित.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

कडक पोलिस आयुक्तांची कडक शिस्त
गैरवर्तणूक प्रकरणी तीन पोलिस कर्मचारी निलंबित.
पिंपरी, दि. ६ (शफीक शेख) :- पकडलेल्या भंगाराच्या गाडीवर कायदेशीर कारवाई न करता पैसे घेऊन गाडी सोडणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी निलंबित केले आहे. शुक्रवारी (दि.4) रात्री उशीरा तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले. हा प्रकार एक महिन्यापूर्वी घडला असून निलंबित तिन्ही पोलीस कर्मचारी हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
ज्योतिराम झेंडे, विलास बोऱ्हाडे ,अशोक घुगे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
एक महिन्यापूर्वी तिघांनी भंगाराची गाडी पकडली होती. या गाडीवर कायदेशीर कारवाई न करता पैसे घेऊन गाडी सोडून दिली होती. पोलिसांनी कारवाई न करता पैसे घेऊन गाडी सोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी तिघांना निलंबित केले.
पोलीस आयुक्तांच्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
ज्योतिराम झेंडे, विलास बोऱ्हाडे, अशोक घुगे यांनी गंभीर स्वरुपाच्या गैरवर्तणूक प्रकरणी शिस्तभंग केला आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात येत आहे, असे पोलीस आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button