पुणे:-वाकड:-तुळशीच्या लग्नानिमित्त ‘आप’चे अजय सिंग यांच्या वतीने तुळशीची रोपे वाटप.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
तुळशीच्या लग्नानिमित्त ‘आप’चे अजय सिंग
यांच्या वतीने तुळशीची रोपे वाटप.
वाकड, दि. 4 (शफिक शेख):- काळा खडक येथील माता भगिनींना आज रोजी तुळशीच्या विवाहानिमित्त आम आदमी पार्टीचे अजय सिंग यांच्या हस्ते तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
तुळस ही बहुजन कष्टकरी वर्गाच्या वारकरी संप्रदायाच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. तुळस हे मांगल्याचे प्रतीक आहे, वैज्ञानिक दृष्टीकोनातून वड, पिंपळ प्रमाणे तुळस लागवडीमुळे प्राणवायूचा समतोल राखते. वारकरी संप्रदाय तुळशीचे महत्व सांगतो, शहरातील नागरिकांनी घरामध्ये विदेशी रोपे न लावता तुळशीचे वृंदावन राखावे, असे यशवंत कांबळे यांनी सांगितले.
यावेळी राज भाई चाकने, यशवंत कांबळे, ब्रम्हानंद जाधव, संतोषी नायर, अजय सिंह, गोविंद माळी, स्वप्नील जेवळे, प्रविण शिंदे, सीमा यादव, ओमीन गायकवाड, सर्फराज मुल्ला, सुरेश भिसे, देवेंद्र सिंग यादव, अजिनाथ सकट, जावळे मामा, राजेश सपारे, रोहित सरनोबत, जावळे मामी, आशुतोष शेळके आदी उपस्थित होते.