पुणे भोसरी:-इंद्रायणीनगर येथे बेकायेशीर दारूविक्री प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
इंद्रायणीनगर येथे बेकायेशीर दारूविक्री प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल.भोसरी, दि. 28 (शफिक शेख):- इंद्रायणीनगर येथे न्यू रॉयल फास्ट फूड या हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे दारू विक्री आणि साठा केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल करून 8 दारूच्या बाटल्या जप्त केल्या.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गस्तीवर असणा-या सचिन माने, पोलीस शिपाई यांना इंद्रायणीनगर येथील न्यू रॉयल फास्ट फूड येथे बेकायदेशीरपणे दारूचा साठा आणि विक्री करीत असताना त्यांनी किरण चंद्र सिंग आणि हॉटेल मालक महेंद्र सरोदे यांच्याकडून मॅक्डोव्हेल कंपनीच्या 180 मिली च्या एकूण 8 बाटल्या जप्त करून दोघांविरूद्ध भादंवि कलम 626/2022, 65 (ई) नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हवालदार के. एस. कदम हे करीत आहेत.