आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे सातारा विभागीय खो खो (महिला) स्पर्धाचे उदघाटन.

सह-संपादक आशितोष चव्हाण.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 सह-संपादक आशितोष चव्हाण.

वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे सातारा विभागीय खो खो (महिला) स्पर्धाचे उदघाटन.

कराड (दि. 6, प्रतिनिधी) कराड येथील वेणूताई चव्हाण कॉलेजच्या आदरणीय पी. डी. पाटील क्रीडानगरीमध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत सातारा विभागीय खो खो (महिला) स्पर्धांचे उदघाटन प्रमुख अतिथी मा. श्री नंदकुमार बाटाणे (विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या उदघाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री अरुण पांडुरंग पाटील (काका) विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड) हे उपस्थित होते. तसेच समारंभ प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा. अल्ताफहुसेन मुल्ला साहेब, मा. श्रीमती वैशाली खाडे (सचिव, सातारा विभागीय क्रीडा परिषद, सातारा) तसेच यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार आदी मान्यवर  उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे मा. नंदकुमार बटाणे मार्गदर्शन करताना म्हणाले की, या महाविद्यालयास खेळाची समृध्द परंपरा असून सातारा जिल्ह्यामध्ये एकमेव असे आठ लेनचे सुसज्ज असे मैदान आहे. खेळाडू मैदानावर आला की तो परिपूर्ण होतो. म्हणून आदरणीय पी. डी. पाटील यांनी  दूरदृष्टीने या मैदानाची निर्मिती केली.  महाविद्यालयाचा क्रीडा विभाग उत्तमरित्या कार्यरत असून यशाची उज्ज्वल परंपरा आहे. सर्व खेळाडूंनी अतिशय चांगल्या प्रकारे खेळून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.”
मा. अल्ताफहुसेन मुल्ला साहेब आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ,”आपल्या लाहानपणात आपण कधी ना कधी हा खेळ खेळलाच असेल. खो खो या खेळाला पारंपारिक खेळ म्हणूनही ओळखले जाते. हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जात आहे व म्हणून खूप लोकप्रिय देखील आहे. हा खेळ भारतातच जन्माला आला आहे. सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. ”

या समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले. प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांचा परिचय प्रा. डॉ. एम. ए. कदमपाटिल यांनी करून दिला तर आभार प्रा. श्री व्ही. एस. डाफळे यांनी मानले. समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीमती एस. पी. पाटील यांनी केले. यावेळी उदघाटन समारंभास प्रा. दिग्विजय पाटील, प्रा. सावंत, प्रा. साळवे याचबरोबर सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील क्रीडाशिक्षक, खेळाडू स्पर्धक, प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button