पुणे ग्रामीण पोलिसांची चमकदार कामगिरी केवळ 2 दिवसांत खूनाचा उलगडा करून दोन्ही आरोपी जेरबंद.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
पुणे ग्रामीण पोलिसांची चमकदार कामगिरी केवळ 2 दिवसांत खूनाचा उलगडा करून दोन्ही आरोपी जेरबंद.
आंबेगाव, दि. 18 (शफिक शेख):- मौजे आंबेगाव बु. येथे दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या अनोळखी मृतदेहाचा छडा लावत आणि त्याच्या खूनाचा पूर्ण उलगडा करत संबंधित खूनात सामील असणा-या दोन्ही आरोपींना जेरबंद करून पुणे ग्रामीण पोलिसांनी चमकदार अशी कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे समस्त ग्रामस्थांमधून पोलिसांचे कौतुक होत असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, दि १२ रोजी मौजे आंबेगाव बु!! ता. वेल्हा जि. पुणे येथे कदावे-शिरकोली रोडलगत एक अनोळखी इसम मृत अवस्थेत पडलेला असून त्याचा मृतदेह कुजलेला आहे. याप्रमाणे गुन्हा दाखल होता, सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा होता तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृत इसमास अत्यंत क्रूरपणे मारून त्याचे शीर धडावेगळे करून त्याचा डावा हात तोडून टाकलेला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सुचना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेस दिल्या होत्या. पोलीस नाईक अमोल शेडगे यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळाली की गुन्हा करणारा आरोपी संजय बाबुराव कडू देशमुख वय ३६ रा. कुराण बु !! ता.वेल्हा जि. पुणे, धनंजय सदानंद ढमाले वय ३२ रा. अथर्व आपार्टमेंट, विठ्ठल मंदिर जवळ नवी पेठ ता. हवेली जि. पुणे, गणेश दत्तात्रय निवंगुणे वय ४० रा. आंबी ता. वेल्हा जि. पुणे, यांनी केला आहे. आरोपी यांना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीचे आधारे सोमेश्वरवाडी ता. हवेली जि. पुणे येथून ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याचे अनुषंगाने माहिती विचारली असता त्यांनी गुन्हाची कबुली दिली आहे. मयत राहुल प्रकाश रावत वय २८ रा. इंद्रायणीनगर भोसरी पुणे, याचे यातील आरोपी संजय बाबुराव कडू देशमुख रा. इंद्रायणी नगर भोसरी मुळ – रा. कुराण बु!! ता. वेल्हा जि. पुणे यांचेशी पूर्व वैमनस्य असल्यामुळे, मयत राहुल प्रकाश रावत यास पैशाचे आमिष दाखवून भोसरी येथून दांडेकर पूल येथे बोलावून घेऊन, तेथून मौजे आंबी वेल्हा. येथे गणेश दत्तात्रय निवंगुणे याचे पोल्ट्री फार्म वर नेऊन पूर्व वैमनस्येचा राग मनात धरून मारून टाकले. पुरावा नष्ट करण्यासाठी राहुल रावत यांचा मृतदेह आरोपी गणेश दत्तात्रय निवंगुणे रा. आंबी ता. वेल्हा याचे स्कॉर्पिओ गाडीत घालून मौजे आंबेगाव बु!! येथे बाजूला टाकून दिला होता. सदर गुन्ह्यात कोणताही पुरावा नसताना गोपनीय बातमीदार व कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी वेल्हा पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. यातील आरोपी संजय बाबुराव कडू देशमुख हा सराईत आरोपी असून त्याचेवर हवेली पोलीस, विश्राम बाग पोलीस खडकी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी डॉ. अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण तसेच मितेश घट्टे अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग यांचे मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब ढोले, उप विभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग, पोलीस निरीक्षक अशोक शेळके स्थानिक गुन्हे शाखा नेताजी गंधारे, हनुमंत पासलकर, राजू मोमीन दत्तात्रय तांबे, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, समाधान नाईकनवरे यांचे पथकाने केली.