पुणे निगडी:-बाबासाहेबांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही – मुकुंद रणदिवे.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
बाबासाहेबांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही – मुकुंद रणदिवे.
निगडी, दि. 16 (शफिक शेख):- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत केंद्रिय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्याच्या धिक्कार करण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी रिपब्लिकन सेनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्री. मुकुंद रणदिवे बोलत होते.
यावेळी बोलताना रणदिवे म्हणाले की, केंद्रिय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी धम्म भूमी नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात आरएसएस आणि भारतीय जनता पार्टीच्या स्टेजवर बोलताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत वादग्रस्त वक्तव्य करीत तमाम जनतेची मने दुखावली आहेत. तमाम जनतेच्या मनात बाबासाहेबांविषयी नितांत आदर आहे त्यामुळे जनता कधीही बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही. रामदास आठवले यांनी सदर वक्तव्याबाबत तमाम जनतेची माफी मागावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन सेना संस्थापक अध्यक्ष – सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या यांच्या मार्गदर्शनाने पिंपरी चिंचवड शहर आध्यक्ष मुकुंद रणदिवे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा -भिमाताई तुळवे, जेष्ठ नेते भिमराव सुरवसे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष लहु आमराळे, झोपडपटीं सेल अध्यक्ष राजु गायकवाड, शहर संघटक रमेश कांबळे, पिं.चि शहर उपाध्यक्ष लक्ष्मण साळुंके, संतोष लोंढे, रुपेश जाधव, संगिता बागडे, विमल प्रधान ताई, केशव गायकवड, सचिव राजेंद्र कांबळे, रामभाऊ पवार, हिरालाल जैस्वाल, रामपप्रसाद गुप्ता, सिकंदर, राम आवतार जैस्वाल, छाया क्ष्रीसागर, भारत वाघमारे, हलिमा शेख ईत्यादी पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.