पुणे पिंपरी:-महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधा मिळाव्यात – “आप” कार्यप्रमुख वालदोर.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मुलभूत
सुविधा मिळाव्यात – “आप” कार्यप्रमुख वालदोर.
पिंपरी, दि. 15 (शफिक शेख):- पिंपरी चिंचवड शहरांमध्ये महापालिकेकडून स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक विकास कामे चालू असताना महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांना दिनांक 12 ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले.
शिक्षण विषयक समस्यांचे निवेदन घेऊन आप चे शहर प्रशासकीय कार्यप्रमुख यल्लाप्पा वालदोर यांच्या मार्गदर्शनात आप चे प्रतिनिधी मंडळ काल महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. संदर्भात बोलताना यलाप्पा वालदोर म्हणाले की सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनाने प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे हे धोरण अवलंबले तरी अंमलबजावणी बाबतीत शासनाची धोरणे ही त्यांच्या घोषणेशी पूरक नाहीत. पिंपरी चिंचवड क्षेत्रातील महापालिका शाळांमध्ये सुविधा देण्याच्या दृष्टीने पुढील मागण्यांचे निवेदन आम्ही आयुक्तांना दिले आहे.
1. क्रीडा क्षेत्राची महापालिका शाळांना मैदाने नीट केली जावीत.
2. ज्या शाळेत मैदाने नसतील तेथे मैदाने उपलब्ध करण्यात यावी.
3. ऑलिंपिक खेळतील मार्गदर्शन करण्यात यावे.
4. त्यांना लागणारे खेळाचे साहित्य मोफत पुरवण्यात यावे.
5. एखाद्या खेळात प्रावीण्य असेल तर त्याचा पूर्ण खर्च मोफत करावा.
6. शालेय विद्यार्थ्यांना शासनातर्फे देण्यात येणा-या साहित्याचे वेळेवर वाटप करावे.
7. सकस आहारा च्या दृष्टीने खिचडी बरोबर इतर गोष्टींचाही समावेश करावा.
8. मुलांना खेळाचे साहित्य पुरवण्याबरोबरच वेळात प्राविण्य असणाऱ्या मुलांची ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षणाची सोय करावी. यावेळी आपच्या वतीने करण्यात आल्या.
9. महापालिका शाळांना मैदाने नीट केली जावीत तसेच ज्या शाळेत मैदाने नसतील तेथे मैदाने उपलब्ध करण्यात यावी.
10. केवळ 1ली ते 8वी याचबरोबर संपुर्ण 9वी 10वी च्या विद्यार्थ्याना ही हा सकस आहार मिळावा.
11. 1 ली ते 8 वी बरोबर संपूर्ण 9वी 10वी च्या विद्यार्थ्याना ही बुट आणि वह्या मोफत देण्यात यावे.
12. आहार वाटप हा इस्कॉनसारख्या सस्थामार्फत देण्यात यावा.
13. सर्व महापालिका शाळेत पिण्यासाठी फिल्टर मशीन देण्यात यावी.
यावेळी प्रतिनिधी मंडळात पिंपरी चिंचवडचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे, शहर संघटक मनोहर पाटील, पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष ब्रह्मानंद जाधव, अजय सिंह आदी उपस्थित होते.