कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-सण-उत्सवाच्या काळात आता खासगी बसेसना भाडेवाढीस मनाई.

प्रतिनिधी शापिक शेख निगडी पुणे:-9767275783

राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.

सण-उत्सवाच्या काळात आता खासगी बसेसना भाडेवाढीस मनाई.
पुणे, दि. 15 (शफिक शेख) :- दिवाळी आणि इतर सण-उत्सवाच्या काळात नागरिकांना गावी जाण्यासाठी बसेसची गरज असते. शासकीय बससेवा ही पुरी पडत नसल्याने नागरिकांना खासगी बसेसची गरज भासते. परंतु अशावेळी खासगी बस चालक-मालक हे या संधीचा फायदा घेवून भरपूर भाडेवाढ करतात आणि नागरिकांकडून अमाप पैसा उकळतात. सणासुदीच्या काळात दुसरा काहीच मार्ग नसल्याने नागरिकांना अनिच्छेने ही भाडेवाढ स्विकारावी लागते. परंतु आता शासनाने सर्व खाजगी बस चालक – मालक यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी तिकीट दराच्या दिडपटीपेक्षा अधिक भाडेदर आकारण्यास मनाई केली आहे.
दिवाळी सणाचा कालावधी सुरु होत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व बस वाहतुकदारांनी विहीत दरानुसार भाडे आकारणी करावी. आपले वाहन सुस्थितीत असल्याची तसेच वाहनाची सर्व कागदपत्रे वैध असल्याचीदेखील खात्री करावी व दंडात्मक कारवाई टाळावी. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायूवेग पथकातील अधिकाऱ्यांना याबाबत तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रवाशांनी खाजगी बसद्वारे प्रवास करताना तिकीट जादा दराने आकारण्याबाबत तक्रार असल्यास लेखी पुराव्यासह mh14prosecution@gmail.com या ई-मेल पत्त्यावर करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button