वाई:-कळंभे ग्रामपंचायतलां गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांची अनपेक्षित भेट.
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कळंभे ग्रामपंचायतलां माननीय गटविकास अधिकारी,माननीय विस्तार अधिकारी यांची अनपेक्षित भेट.

ग्रामपंचायत कळंभे ,तालुका – वाई
आज वार-मंगळवार, दि.18/11/2025 रोजी माननीय श्री.विजयकुमार परीट साहेब (गटविकास अधिकारी पं स वाई वर्ग- १ पं स वाई) श्री.रुपेश मोरे साहेब (विस्तार अधिकारी पंचायत पं स वाई) यांनी कळंभे ग्रामपंचायतीला अनपेक्षित तथा अचानक भेट देऊन गावाने MSPRA च्या अनुषंगाने केलेली कामे तसेच श्रमदान व लोकसहभागातून झालेली कामांची पाहणी केली त्यावेळी सौ नीलम शिवथरे (सरपंच) ,शकुंतला चव्हाण (उपसरपंच) श्री. प्रकाश बाबर.सौ ज्योती गायकवाड ,श्री आबाजी सुतार ,सौ.सारीका गायकवाड ,श्री संभाजी गायकवाड इ. सर्व ग्रा .पं. सदस्य तसेच श्री.आर एम भोईर ग्रामपंचायत अधिकारी व श्री ए एन प्रभुणे ग्रामपंचायत अधिकारी त्याच बरोबर सौ नूतन बाबर(सी आर पी कळंभे) सौ उल्का शिवथरे(कृषी सखी कळंभे) सौ कविता जाधव (केंद्र चालक) श्री दिलीप वाघ ,सौ माधुरी वाघ ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते इत्यादी समवेत प्रलंबित मोदी आवास योजना घरकुल काम सुरू करण्या साठी पाहणी करून लाभार्थी यांना मार्गदर्शन केले .त्याच बरोबर प्लास्टिक संकलन व वर्गीकरण करणे सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करणे इ. श्रमदान करण्यात आले त्याच बरोबर BDO साहेबांनी श्रमदानातून व लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यांच्या कामांची पाहणी करून कळंभे ग्रामस्थ व महिलावर्गाला प्रोत्साहित केले व अशाच प्रकारची शाश्वत व प्रभावी कामे करून मुख्यमंत्री पंचायतराज अभियाना मध्ये जास्तीत जास्त गावाला गुणांकन कसे मिळवता येईल या बाबत सखोल मार्गदर्शन केले.




