लोहगाव:-वारकरी संप्रदाय हा भक्ती ज्ञान वैराग्याचा समन्वय आहे. सरला बेटाचे महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर :-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
वारकरी संप्रदाय हा भक्ती ज्ञान वैराग्याचा समन्वय आहे-सरला बेटाचे महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज.
लोहगाव (वार्ताहर ) राहाता तालुक्यातील लोहगाव येथील श्री साई सद्गुरु गंगागिरीजी गुरुकुल संस्थांचे भूमिपूजन समारंभ संपन्न झालेला आहे. या संस्थांच्या वतीने विद्यार्थी घडवण्याची व ज्ञानदानाचे कार्य येथे होणार आहे वारकरी संप्रदाय हा भक्ती ज्ञान वैराग्याचा समन्वय आहे मनुष्याचे मन इंद्रिय फार अचपळ आहे त्याला स्थिर करण्यासाठी अध्यात्माची गरज आहे .असे उपदेश महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनी उपस्थित भाविकांना केला राहता तालुक्यातील लोहगाव येथील श्री सद्गुरु गंगागिरी गुरुकुल भूमिपूजन प्रसंगी माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के पाटील. साई निर्माण ग्रुपचे शिर्डीचे विजुभाऊ कोते . जिल्हा परिषद सदस्य तळेगाव गट महिंद्र शेठ गोडगे. राष्ट्रीय श्रीराम संघ सागर भाऊ बेग .माजी उपसभापती पंचायत समिती राहाता बबलू उर्फ बाबासाहेब म्हस्के. लोहगावच्या सरपंच सौ स्मिताताई चेचरे. लोहगाव सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे उपस्थित होते यावेळी अण्णासाहेब म्हस्के म्हणाले की तरुण पिढीला घडवण्याचे संस्कार केंद्र या ठिकाणी सुरू झालेले आहे तरुण वर्गाने इतरत्र भरकट न जाता या ठिकाणी येऊन ज्ञान घ्यावे त्यामुळे या गुरुकुलाचा फायदा या परिसरातील तरुणांना वर्गाला होणारच आहे असे विचारते त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मगर महाराज यांचे कीर्तन सुरू करून भाविकांना त्यांनी मंत्रमुक्त केले सकाळपासूनच या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे महाराज मंडळी व गावातील सर्व तरुण व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत होते सरला बेटाचे महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते कुदळ मारून भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी अण्णासाहेब म्हस्के पाटील विजुभाऊ कोते.व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विखे पाटील कारखान्याचे माजी तज्ञ संचालक भाऊसाहेब चेचरे. यांनी केले उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा यावेळी संपन्न झाला गुरुकुल संस्थांचे अध्यक्ष संदीप महाराजचे श्री व पोकळे महाराज यांनी उपस्थित यांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमासाठी लोहगाव पंचक्रोशीतील त्याचबरोबर लोहारी येथील ग्रामस्थ मोठे संख्येने उपस्थित होते.