पुणे:-‘‘आप’’च्या निषेधानंतर कर्वे पुतळयाशेजारील चंद्रकांत पाटलांचा फ्लेक्स हटविण्यात आला.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
‘‘आप’’च्या निषेधानंतर कर्वे पुतळयाशेजारील
चंद्रकांत पाटलांचा फ्लेक्स हटविण्यात आला.
पुणे, दि. 3 (शफिक शेख):- कर्वे पुतळयाशेजारी पुतळयापेक्षाही भला मोठा आणि उंच फ्लेक्स चंद्रकांत पाटील यांचा का उभारला याचा निषेध आम आदमी पार्टीचे प्रवक्ते डॉ. अभिजीत मोरे यांनी पार्टीतर्फे केला. त्याचा तात्काळ परिणाम होवून तो फ्लेक्स तात्काळ हटविण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर कर्वे पुतळा परिसरात कर्वे पुतळयाशेजारी पुतळयापेक्षाही भला मोठा व उंच पुतळा उभारला गेला होता त्याचा कडाडून निषेध आम आदमी पार्टीतर्फे करण्यात आला. त्याची दखल घेत तात्काळ तो फ्लेक्स तेथून हटविण्यात आला आहे.
काल कर्वे पुतळा येथे आपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन निषेध व्यक्त केला होता. यामध्ये आपचे डॉ अभिजीत मोरे, प्रा सुहास पवार, सुशील बोबडे, निलेश वांजळे, प्रा बाबासाहेब जाधव, किशोर मुजुमदार, सुरेखा भोसले, विद्यानंद नायक, किरण कांबळे, फेबियन समसन, शेखर ढगे, रवी लाटे, आबासाहेब कांबळे, सीमा गुट्टे, रामभाऊ इंगळे, अंजली इंगळे, ऋषिकेश मारणे, शिवाजी डोलारे, संजय कटारनवरे, साहिल जवळेकर, यादव, संतोष सांबरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.