कराड:- मर्चंटने सभासदांचे हित जोपासले_माणिकराव पाटील
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605
राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
कराड:- मर्चंटने सभासदांचे हित जोपासले___माणिकराव पाटील.
मायणी प्रतिनिधी___कराड मधील सहकारी क्रेडिट संस्थेची 2021 22 या वर्षातील 36 वी वार्षिक साधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या संस्थेत या वर्षात सात कोटी 97 लाख ढवळ नफा झाला असून 31 मार्च 2022 अखेर संस्थेच्या 382 कोटी ठेवी आहेत तर एकूण 268 कोटी कर्ज दिली आहेत विविध बँकेत 218 कोटीच्या ठेवीची गुंतवणूक केली आहे संस्थेचे 22 300 सभासद असून एकत्रित व्यवसाय साडेसहाशे कोटीचा झाला आहे संस्थेच्या संचालिका सौ अरुणा चव्हाण यांनी आपल्या प्रस्ताविकात वर्षातील घडलेल्या विविध घटनांचा आढावा घेऊन संस्थेच्या प्रगतीमध्ये सभासद ठेवीदार कर्जदार यांचा मोलाचा वाटा असलेले सांगितले यावर्षीची निवडणूक बिनविरोध झालीअसून नूतन संचालकांचा सत्कार यावेळी मर्चंट ग्रुपचे अध्यक्ष सत्यनारायणमिणियार यांच्या हस्ते करण्यात आला संस्थेचे कुटुंब प्रमुख सत्यनारायण मिनियार यांनी सांगितले की केवळ नफा कमवणे हे संस्थेचे उद्दिष्ट नसून तर समाजातील तळागाळातल्या गरीब गरजू लोकांना सक्षम करणे तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या आपत्ती काळात मदत करणे हा उद्देश आहे संस्थेचे चेअरमन माणिकराव पाटील म्हणाले की आम्ही चारशे कोटीचा टप्पा पूर्ण करीत असून 700 कोटीचा एकत्रित व्यवसाय करणार आहोत सीबीएस प्रणालीप्रमाणे मोबाईल बँकिंग आरटीजीएस क्यूआर कोड या सुविधा सुरू केलेल्या आहेत संस्थेला यंदा पतसंस्था फेडरेशनचा दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व संचालकांनी व सभासदांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले शेवटी डॉक्टर शरद क्षीरसागर यांनी आभार मानले