आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-एस बी पाटीलच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात १००% प्लेसमेंट.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

एस बी पाटीलच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात १००% प्लेसमेंट.

पुणे:शहाजीराव पाटील विकास प्रतिष्टान संचलित एस. बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या नामांकित आय टी कंपन्यांमध्ये कॅम्पस मुलाखतीतून चालू शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मधील सर्व विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. यामध्ये प्रामुख्याने कॉग्निझंट, एच सी एल, इ झेस्ट, इन्फोसिस,एचसीएल ,विप्रो ,कॅपजेमिनी,मसिस टेकनॉलॉजि ,पेंटागॉन स्पेस ,क़ु स्पायडर ,बी इ पी इंडिया सिस्टिम या कंपन्यांचा समावेश आहे. त्यापैकी इ झेस्ट (६एल पी ए) तसेच व्ही ओ आय एस (५ एल पी ए) मध्ये स्वप्नाली जगताप ,कॅपजेमिनी कंपनीमध्ये निखिल अभंग आणि कीर्ती निंबाळकर(४ एल पी ए) , अटॉस सिन्टेल मध्ये स्वप्नाली जगताप, मुलाणी शाहरुख,हुमेरा शेख(३.४ एल पी ए) विप्रो मध्ये अविनाश टकले , स्वप्नाली जगताप(३.५ एल पी ए),इन्फोसिस मध्ये शिवतेज शिंदे, हुमेरा शेख, अभिषेक वाघमोडे (३.६ एल पी ए), एच सी एल मध्ये अविनाश टकले(४.२५ एल पी ए) तर टीसीएस मध्ये कीर्ती निंबाळकर (४ एल पी ए) या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.या बरोबरच कोअर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी बी इ पी इंडिया सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड मध्ये रामचंद्र सरवदे ,अभिषेक वाघमोडे,आदित्य लवटे आणि अक्षय खरात यांची निवड झालेली आहे तसेच पेंटागॉन स्पेस प्रायव्हेट लिमिटेड,टॅप अकॅडेमि प्रायव्हेट लिमिटेड,ब्रिस्टॉल टेकनॉलॉजि ,हडसन आजाईल व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड ,ई स्केडार, चेरीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यासारख्या कंपन्यांमध्येही उर्वरित विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. त्याच बरोबर या विभागातील काही विद्यार्थी महाविद्यालयाच्या ‘इंटर्प्रिनरशिप डेव्हलपमेंट सेल’ च्या मदतीने उद्योजक म्हणून नावारूपास आलेले आहेत.
२००९ साली स्थापन झालेल्या एस बी पाटील अभियांत्रिकीमधून प्लेसमेंट च्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विध्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. महाविद्यालयातील सर्व लॅब्स या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज आहेत. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंदहि उच्च शिक्षित आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात विध्यार्थ्यांना ट्रैनिंग आणि प्लेसमेंट विभागामार्फत स्वतंत्रपणे कुशल प्रशिक्षकाद्वारे अँपटीटयूड टेस्ट , कम्युनिकेशन स्किल ,टेकनिकल स्किल ,मॉक इंटरव्हिव ,ग्रुप डिस्कशन यांचे मार्गदर्शन केले जाते. या विभागाचे विभागप्रमुख प्रा. व्ही यू बनसुडे हे नेहमी विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांची निवड नामांकित कंपन्यांमध्ये व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळण्यासाठी वेळोवेळी इंडस्ट्रियल व्हिझीट,इंटर्नशिप प्रोग्रॅम,वेगवेळ्या विषयांची कार्यशाळा तसेच प्रशिक्षित तत्ज्ञां कडून मार्गदर्शन केले जाते. ई अँड टी सी विभागात वार्षिक परीक्षांचे उत्कृष्ट निकालाची परंपरा टिकविण्यासही सर्व प्राध्यापक वर्ग नेहमीच विशेष प्रयत्न करतात.या विभागाची पदवी घेतल्याने विद्यार्थ्यांना कोर इलेक्ट्रॉनिक्स,टेलिकॉम सेक्टर’,गव्हर्नमेंट सेक्टर यामध्ये तर नोकरीच्या संधी आहेतच पण सॉफ्टवेअर क्षेत्रातहि ई अँड टी सी विभागातील विद्यार्थ्यांना मोठी मागणी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी ई अँड टी सी विभाग निवडला तर त्यांना नक्कीच भविष्यामध्ये नोकरीच्या चांगल्या संधी चालून येतील असे विभागाचे ट्रेनिंग प्लेसमेंट प्रमुख प्रा.एम एम झाडे म्हणाले. चालू शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्याआधीच नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एस. पी. कांबळे आणि संपूर्ण टीम यांचे मार्गदर्शन विध्यार्थ्यांना नियमित पणे लाभत असते.
महाविद्यायाचे प्राचार्य डॉ. एस. टी. शिरकांडे म्हणाले, महाविद्यालयाचा नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विविध विषयांच्या ट्रेनिंग्ज, तसेच प्लेसमेंटमध्ये महाविद्यालय आघाडीवर आहे. विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग’चा विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी फायदा होत आहे.
या संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब, सचिव मा.सौ. भाग्यश्रीताई पाटील ,उपाध्यक्षा सौ. अंकिताताई पाटील-ठाकरे आणि विश्वस्थ मा. राजवर्धनदादा पाटील यांनी निवड झालेल्या विध्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button