कात्रज :- रस्त्याची दुरुस्ती लवकर न केल्यास रास्तारोकोचा नागरिकांचा इशारा.
प्रतिनिधी:- रफिक शेख पुणे :-9021132121

रस्त्याची दुरुस्ती लवकर न केल्यास रास्तारोकोचा इशारा
कात्रज, दि.18 (अब्दुलरहिम शेख) : येथील संतोषनगर ते दत्तनगर हा रस्ता नागरिकांसाठी जीवघेणा बनला आहे, संबंधितांनी या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्त करावी अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांकडून देण्यात आला आहे.
संतोषनगर मधील गल्ली नंबर सात समोरील दत्तनगरला जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व्हिस रोड हा मृत्यूचा सापळा बनला आहे. याठिकाणी काढलेल्या खड्ड्यांमुळे, अरुंद रस्ता आणि ये-जा करणाऱ्या वाहनाच्या वर्दळीमुळे या रस्त्यावरून नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
त्याचप्रमाणे कात्रज ते दत्तनगर या रस्त्यावर जैन मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या काॅर्नरच्या समोरील सर्व्हिस रोडवरील काढलेल्या खड्ड्यांमुळे जैन मंदिराकडे जाणाऱ्या वाहन चालकांना जीवघेणी कसरत करावी लागते. शिवाय पादचारी नागरिकांना जिवीत आणि वित्त हानीचा धोका असल्याने नागरिकांना हा पथ प्रवासासाठी त्रासदायक ठरला आहे.
तरी संबंधितांनी 45 दिवसापासून रखडलेल्या या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून नागरिकांना मदत करावी अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे येथील नागरिकांकडून बोलले जात आहे.