आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-जिजाऊ वसतिगृहातील अनाथांची दिवाळीसाठी बहुजन शिक्षक संघ आघाडीवर,,,,,,,

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

जिजाऊ वसतिगृहातील अनाथांची दिवाळीसाठी बहुजन शिक्षक संघ आघाडीवर,,,,,,,

कराड दि: सातारा जिल्हा बहुजन संघाच्या वतीने कोळे ता. कराड येथील जिजाऊ वसतिगृहातील अनाथांची दिवाळी गोड करण्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत. त्यामुळे अनाथांना हककांचा नाथ मिळाला आहे. त्यांची दिवाळी आता गोड फराळ व फटाक्याच्या आतिषबाजीत साजरी होणार असल्याने सर्वांनाच मनस्वी आनंद वाटत आहे.

बहुजन शिक्षक संघाकडून नदाफ दाम्पत्यांकडून चालवले जाणाऱ्या अनाथ मुलांच्या कोळे येथील जिजाऊ वसतिगृहातील सर्व अनाथ ३५ मुलांस ड्रेस व लाडू- चिवडा असा फराळ देणेत आला.सातारा जिल्हा बहुजन परिवार सदस्या नंदा लोखंडे यांनी मोठ्या मनाने आपल्या उत्त्पनातून अमेरिकेतून चाळीस हजार रुपये जिल्हा सचिव महेश लोखंडे यांचे बँक खातेवर पाठवले होते. या रकमेचा धनादेश नदाफ या अनाथ मुलांच्या जिजाऊ वसतिगृहाच्या संचालकांकडे कराड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सन्मती देशमाने यांचे हस्ते देणेत आला. तसेच सर्व मुलांना ड्रेसचे वाटप करणेत आले.यावेळी कराड तालुक्याचे विस्तार अधिकारी जगताप व विस्तारअधिकारी जमिला मुलाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सातारा जिल्हा बहुजन शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष उदय भंडारे,जिल्हा सचिव महेश लोखंडे ,जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब खरात ,माजी तालुका अध्यक्ष सदानंद साबळे ,माजी तालुका अध्यक्ष राजाराम कारंडे ,तालुका सचिव संगीता वाघमारे ,तालुका महिला विभाग प्रमुख रुपाली काटे ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य नलिनी बैले,शारदा लोकरे ,सुनंदा पाटणकर ,कराड तालुका कार्यकारिणी सदस्य अजित वाघमारे ,संघटक संतोष रसाळ,प्रतीक्षा लोखंडे,छाया शिंदे,पुजा भंडारे ,ज्येष्ठ मार्गदर्शक पाटणकर व युवा क्षितिज काटे हे उपस्थित होते.
सर्व अनाथ मुलांना दिवाळी फराळ दिला व संगीता वाघमारे यांनी मुलांना फटाके दिले. छोट्या बाल गोपाळांची दिवाळी गोड करणेसाठी बहुजन शिक्षक परिवारातील बंधूभगिनी यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. .या उपक्रमास सातासमुद्रापार अमेरिकेतून मदत आली. देश व राज्यातून मदत करणाऱ्या सर्वांचे बहुजन परीवारा मार्फत शतशःआभार मानण्यात आले .डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सातारा जिल्ह्यातील प्रतापसिंह हायस्कूल शाळा प्रवेश दिनाचे निमित्ताने व दिवाळी महोत्सवात आनंद मिळावा .यासाठी मुलांना मदत केली आहे.. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शाळा प्रवेश दिनाचे निमित्ताने हा कार्यक्रम बहुजन शिक्षक संघाकडून संपन्न झाला. अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या व भीम कन्या रेखा कसबे यांनी दिली आहे.

कराड तालुका माजी अध्यक्ष सदानंद साबळे व विद्यमान कराड तालुका महिला विभागप्रमुख रूपाली काटे व जिल्हाध्यक्ष उदय भंडारे यांनी सहकार्य केले. लवकरच जमाखर्च अहवाल ग्रुपवर पाठवला जाणार आहे. या विधायक उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून दिवाळी साजरी करणे म्हणजे इतरांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवणे. हीच खऱ्या अर्थाने सण साजरा करण्याची मानवतावादी रूढी परंपरा आहे. त्याचे पालन करत असताना संविधानाच्या माध्यमातून समता निर्माण करण्यासाठीच सर्वांनाच आनंद सहभागी करून घेणे. हेच यातून अभिप्रेत होत आहे. अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक बाळकृष्ण देसाई, अमोल गंगावणे, मिलिंद कांबळे यांनी स्पष्ट केले.

—————————————-
फोटो -कोळे ता कराड येथील जिजाऊ वसतिगृहात अनाथ मुलांना भेट देताना मान्यवर (छाया- निनाद जगताप- कराड)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button