औरंगाबाद:-“सैनिक फेडरेशन औरंगाबाद”सैनिक समन्वय समितीची स्थापना करून आजी-माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9373299248

*प्रेस नोट*
सैनिक फेडरेशन औरंगाबाद
पत्ता – श्री गजानन वर्क फोर्स ली.*
*N-11 C-5 34/4
SBOA स्कूल जवळ ,हडको जळगाव रोड,औरंगाबाद
सैनिक हो तुमच्यासाठी
राज्यातील आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबीयांच्या अडी अडचणी राज्यातील बहुतांशी माजी सैनिक संघटनांनी गेल्या कित्येक वर्षापासून शासनाकडे विविध प्रकारे मांडल्या आहेत. परंतु त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे राज्यातील प्रमुख माजी सैनिक संघटनांनी एकत्र येऊन एक सैनिक समन्वय समितीची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून राज्यातील सैनिक व त्यांच्या परीवारांशी निगडीत मुख्य समस्या घेऊन आम्ही खालील प्रमाणे मागण्या करीत आहोत.
राज्यातील माजी सैनिकांच्या मुख्य मागण्या खालील प्रमाणे
२. सैनिकी सेवेत असताना सैनिकांचा मृत्यू किंवा कायम स्वरूपी अपंगत्व आल्यास केंद्र/ राज्यशासन सेवेसाठी अनुकंपा धोरण लागू करणे.
२. पुनर्नियुक्त माजी सैनिकांसाठी (कृषिविभाग, ग्रामविकास व शिक्षणविभाग) कंत्राटी पद्धत रद्द करून सुरवातीपासून नियमित नियुक्ती व वेतन निश्चिती देणे.
३. फ्लॅग डे फंडाच्या निधीचे सैनिक व सैनिक संघटनांच्या सामाजिक कार्यासाठी वापर करणे. २००४ नंतरमुख्यमंत्र्याची बैठक न झाल्यामुळे तो पैसाही सैनिकांना मिळाला नाही.
४. सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनसाठी सैनिक सुरक्षा कायदा करणे.
५. सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समित्या शासन निर्णय प्रभावीप्रमाणे लागू करण्यासाठी समित्यांची पुनः रचना करून त्रैमासिक बैठका घेऊन सैनिकांच्या अडी अडचणी सोडविणे.
६. सैनिकांचे प्रश्न विधीमंडळामध्ये मांडण्यासाठी विधानपरीषदमध्ये पदवीधर मतदार संघ व शिक्षक मतदार संघाप्रमाणे योग्य प्रमाणांत सैनिकांना प्रतिनिधीत्व देणे.
७.सैनिकांना वयाच्या ५८ वर्षा पर्यंत नोकरीची हमी
ह्या महत्व पूर्ण मागण्यासाठी सैनिक फेडरेशन संपूर्ण महाराष्ट्रात सैनिक संमेलन आयोजित करत आहे.
मा.ब्रिगेडियर सुधीर सावंत
माजी खासदार, अध्यक्ष सैनिक फेडरेशन.