खटाव:-मायणी परिसरात डिझेल पेट्रोल चोरट्यांचा सुळसुळाट- नागरिक हैराण.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
मायणी परिसरात डिझेल पेट्रोल चोरट्यांचा सुळसुळाट- नागरिक हैराण.
मायणी प्रतिनिधी__खटाव तालुक्याच्या दक्षिणेकडील व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेल्या मायणी परिसरात सध्या डिझेल पेट्रोल चोरट्यांचा. सुळसुळाट झाला असून वाहनधारक नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की माहिती येथील ट्रक मालक विजय रामचंद्र देशमुखे यांच्या मालकीचा ट्रक एम एच 11 ए एन ३७२१ मधून सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शंभर ते एकशे वीस लिटर डिझेल चोरले यांच्या या वाहनातून गेल्या सहा महिन्यात पाच ते सहा वेळा डिझेल चोरी झाली आहे याबाबत त्यांनी मायणी पोलीस स्टेशनला अनेक वेळा तक्रार करूनही चोरीचा तपास लागला नाही. तसेच मल्हार पेठ पंढरपूर रस्ता मायणीच्या उभ्या पेठेतून जातो या रस्त्याच्या कडेला अनेक वाहने उभी असतात चोरटे अलगद वाहन उचलून नेतात सीसीटीव्ही मध्ये चोरटे दिसतात परंतु त्यांचा तपास लागत नाही ही वस्तुस्थिती आहे. सदर घटनेची नोंद मायनी पोलीस स्टेशनला झाले असून सहाय्यक फौजदार शितल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भूषण माने अधिक तपास करीत आहेत.