सातारा:-नागठाणे येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम जिलेटीनच्या स्फोटाच्या साह्याने फोडले धाडसी दरोडा.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
नागठाणे येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र चे एटीएम फोडले जिलेटीनच्या स्फोटाच्या साह्याने धाडसी दरोडा.
सातारा जिल्ह्यात गेले अनेक दिवसांपासून एटीएम दरोडा सत्र सुरू असुन आज पहाटे रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सातारा पासून पंधरा किलोमीटर नागठाणे येथील सासपडे रस्त्यावरील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम वर धाडसी दरोडा टाकला असुन एटीएम जिलेटीन कांड्याने स्फोट करून उडवून दिले या मधील रोख रक्कम घेऊन चोरटे पळून गेले आहेत या घटनेनंतर बोरगाव पोलिसांनी तसेच सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक बन्सल साहेब, बोराडे साहेब यांनी घटनास्थळी भेट दिली असून नक्की किती रोख रक्कम लंपास केले या बाबत अधिकृत माहिती अध्याप मिळाली नाही घटनास्थळी माहिती व पंचनामा करताना बोरगाव पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक डाळींबकर मॅडम बीट अंमलदार सावंत साहेब व त़्याची टीम तपास करीत आहे.