क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे पिंपरी:-जाधववाडी परिसरात 4219 चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम पाडले.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

जाधववाडी परिसरात 4219 चौरस फुटाचे
अनधिकृत बांधकाम पाडले.
पिंपरी, दि. १२ (शफीक शेख): – प्रभाग क्र. ०२ व ०८ मधील स्पाईन सिटी चौक ( कल्चर क्रेस्ट सोसायटी ) व पंतनगर, जाधववाडी येथील अनाधिकृत बांधकामावरती निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सुमारे ४२१९ चौरस फ़ुट अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क क्षेत्रिय कार्यालय, अतिक्रमण पथकाच्या मार्फ़त दि.१२/१२/२०२२ अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली निष्कासनाची कारवाई करण्यात आली. कल्चर क्रेस्ट सोसायटी मधील सदनिका धारकांनी अनधिकृपणे कव्हर केलेल्या बाल्कनी, ग्रील, शेड, डक्ट, इमारतीचे सामासिक अंतर व अंतर्गत बदल करण्यात आले होते, त्याबाबतच्या तक्रारी सोसायटीकडून प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने सदरची कारवाई करण्यात आली.
आज करण्यात आलेल्या या कारवाईत अतिक्रमण पथक प्रमुख संतोष शिरसाठ, कनिष्ठ अभियंता संदिप वैद्य, प्रसाद आल्हाट, निवृत्ती गुणवरे, योगेश शेवलकर, राजश्री सातळीकर, रिता जाधव , शितल भोसले व साधना ठोंबरे क प्रभाग अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र व पोलीस पथक सहभाग झाले होते. दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे.
सोसायटी मधील सदनिका धारकांनी / नागरिकांनी अनधिकृपणे कव्हर केलेल्या बाल्कनी, ग्रील, शेड, डक्ट, इमारतीचे सामासिक अंतर व अंतर्गत बदल करु नये, या बाबत मनपा कडून आवाहन करण्यात आले. तसेच अशा प्रकारचे बदल करण्यात आले तर महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था कायदा १९६६ नुसार संस्थेचे परवानगीशिवाय बांधकामामध्ये बदल केल्यास आदर्श उपविधीच्या उपविधी क्र.१६६ अन्वये गृहरचना संस्थेने संबधितावर कारवाई सोसायटीने करावी अन्यथा मनपा मार्फ़त कारवाई करण्यात येईल.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button