कराड:-बनुबाई येलवे नावाचा आंबेडकरी विचारांचा कृतीशील झंझावात थंडावला भीमाची वाघीण बनुबाई येलवे काळाच्या पडद्याआड.
प्रतिनिधी अभिजीत बल्लाळ कराड:-8421223931

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
कराड:- बनुबाई येलवे नावाचा आंबेडकरी विचारांचा कृतीशील झंझावात थंडावला भीमाची वाघीण बनुबाई येलवे काळाच्या पडयाआड अखेरचा जयभीम!
अनेक वर्षापासून कराड तहसीलदार कार्यालयाचा पदभार सांभाळणारे नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड त्यांच्याबद्दल मोठ्या कौतुकाने सांगतात की,”बनुताई गोरगरीब,विधवा,अपंग,गरजु यांचे प्रश्न घेऊन नेहमी कार्यालयात येत असायच्यात्या खूपच तळमळीने,आक्रमकपणे पण,लोकशाही मार्गाने लोकांच्या समस्या मांडतात आणि सोडवतात देखील.अन्यायाविरोधात त्या कायम संघर्ष करतात.सामान्यांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्ती आपल्या समाजात फार कमी आहेत,त्यातीलच त्या एक आहेत“.
अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या आणि भीमाची वाघीण अशी ओळख असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी बनुबाई येलवे यांचे कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये निधन झाले.