मावळ:-ऐन गणपती उत्सवात आंदर मावळ व नाणे मावळ भागात विजेचा लपंडाव.
प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर मावळ:-9960044802

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
ऐन गणपती उत्सवात आंदर मावळ व नाणे मावळ भागात विजेचा लपंडाव.
त्रस्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा!
आंदर मावळ व नाणे मावळ भागात गेले काही दिवससांपासून विजेचा लपंडाव पाहायला मिळत आहे. ऐन गणपती उत्सवात विजेचा लपंडाव सुरु असल्याने सर्वच नागरिक अत्यंत त्रस्त झालेले आहेत. गणपतीसाठी काही गावांमध्ये मंडळांकडून विविध देखावे सदर केले जातात परंतु वीज नसल्याने देखाव्यासाठी घेतलेली मेहनत वाया गेल्याची भावना काही मंडळाच्या अध्यक्षांकडून व्यक्त होत आहे. तसेच घरगुती गणपतीसाठी केलेली आरास देखील निष्फळ ठरल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. गेली दोन वर्षे कोरोना निर्भांधांमुळे मुक्तपणे गणपती उत्सव साजरा करता आला नाही या वर्षी सर्व निर्बंध शिथिल झाल्यामुळे सर्व नागरिक खुप खुश आणि आनंदी होते मात्र या विजेच्या लपंडावामुळे या सर्व आनंदावर पाणी पडल्याची भावना आंदर मावळ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष भारत अडीवळे यांनी व्यक्त केली. तसेच विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी जनसेवक पै.देवाभाऊ गायकवाड यांनी मावळ तालुका महावितरण विभागाचे उपअभियंता सुर्यवंशी साहेब यांना निवेदन देत रोज होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे नाणे मावळ व आंदर मावळ भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्यात यावा अन्यथा दोन्ही भागाच्या जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देवाभाऊ गायकवाड यांनी महावितरणला दिला.
यावेळी मावळ तालुका महावितरण विभागाचे उपअभियंता सुर्यवंशी साहेब यांनी हि गंभीर बाब लक्षात घेऊन लवकरच विजेचा हा प्रश्न सोडविण्यात येईल असे अश्वासन दिले.