शिरगाव:-(वाई)-सांस्कृतिक भवन शिरगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सांस्कृतिक भवन शिरगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त
यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी, सातारा यांच्या विद्यमाने महिलांसाठी लघुउद्योग मार्गदर्शन व प्रशिक्षण नियोजन शिबिर आयोजित करण्यात आले.प्रमुख उपस्थिती मा.प्रा.जीवन बोराटे,मा.प्रा.डॉ.समता माने
मा.श्री संकेत माने (समन्वयक),सौ.दैवता भोसले (सरपंच) समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि स्त्रीशक्तीच्या अग्रदूत असलेल्या सवित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
शिक्षण प्रेमी दिलीप भोसले सर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले . यशश्री अकॅडमी चे संस्थापक माननीय किरण सर यांनी देखील या कार्यक्रमासाठी हजेरी लावली आणि महिलांना मार्गदर्शन करत महिलांसाठी कायम मदत करू अशी ग्वाही दिली.
माननीय प्राचार्य जीवन बोराटे सर यांनी महिलांसाठी लघुउद्योग प्रशिक्षण, तसेच डिजिटल मार्केटिंगविषयी मार्गदर्शन केले सध्याच्या बदलत्या काळात महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे, व्यवसायासाठी डिजिटल साधनांचा वापर करावा आणि आर्थिकदृष्ट्या सबळ व्हावे या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.
माननीय प्रां. डॉ.समता माने यांनी महिलांना घरबसल्या करता येणाऱ्या विविध व्यवसायांची माहिती दिली. माननीय संकेत माने सरांनी उपस्थित महिलांना ऑनलाईन मार्केटिंग, सोशल मीडिया प्रमोशन, ग्राहकांशी संवाद, उत्पादनांची मांडणी, तसेच डिजिटल व्यवहार याबद्दल उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी महिलांनी या सर्व गोष्टींना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी सवित्रीबाई फुले यांच्या कार्याचा व कर्तृत्वाचा आढावा घेत महिलांना प्रेरक संदेशही दिला. महिलांनी हा उपक्रम आयोजित करण्यासाठी सहकार्य केलेले दिलीप सर यांचे मनापासून आभार व्यक्त केले व अशा प्रकारचे कार्यक्रम भविष्यातही आयोजित करावेत अशी मागणी व्यक्त केली.
या उपक्रमामुळे स्थानिक महिलांमध्ये उद्योजकतेची भावना वृद्धिंगत होऊन स्वावलंबनाची दिशा अधिक बळकट होणार.




