आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साताऱ्यात भीमशक्ती संघटनेच्या वतीने डॉ आंबेडकर जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

साताऱ्यात भीमशक्ती संघटनेच्या वतीने डॉ आंबेडकर जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप.

सातारा दि: महामानव घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा आणि त्यानंतरच संघर्ष करा असा सर्व समाजाला संदेश दिला होता. या संदेशाला अनुकरण म्हणून सातारा जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यात भीमयोद्धा व भीमशक्ती संघटनेचे कार्याध्यक्ष आणि सातारा जिल्हा खादी ग्रामोद्योगचे विद्यमान संचालक अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व जाती धर्मातील गरीब कष्टकरी शोषित विद्यार्थ्यांना शाळेचे दप्तर व साहित्य वाटप करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्धार केला आहे.
या उपक्रमाचे मराठा क्रांती मोर्चा, मराठा महासंघ ,ओ.बी.सी. समाज आणि अल्पसंख्यांक समाज संघटना, पुरोगामी व आंबेडकरवादी चळवळीत काम करणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मनापासून स्वागत केले आहे.
आदरणीय खासदार व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भीमशक्ती संघटनेच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा कोणताही राजकीय पक्षाचा किंवा लोक वर्गणीतून कार्यक्रम होत नसून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संदेशानुसार स्वयंप्रकाशित व्हा. या अर्थाने गोरगरिबांच्या घरामध्ये दीप प्रज्वलित करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. म्हणूनच हे शैक्षणिक साहित्य देण्याचा संकल्प भिम शक्तीचे कार्याध्यक्ष अरुण पवार यांनी केलेला आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सर्व जाती-धर्माला न्याय देणारे आदरणीय नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य डॉक्टर आंबेडकर जयंती सोमवार दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता अल्पोहार बुंदी लाडू व थंड शीतपेय वाटप करण्याचाही कार्यक्रम घेण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमासाठी आनंदराव लादे, मदन खंकाळ, लक्ष्मण कदम, गुलाबराव बनसोडे, शिवाजीराव जाधव , महेश माने, लालसिंग पवार, महारुद्र तिकुंडे, विलास पवार, विशाल पवार ,राजरतन कांबळे, प्राध्यापक विलास वहागावकर, सोमनाथ देशमुख, सतीश वाघमारे, सयाजी कांबळे, दत्ताजी जाधव, सुनीता ढेकळे, यशवंत बरकडे, रंजीत खंडागळे ,उमा काकडे , कुमारी दीक्षा अरुण पवार, सौ कविता पवार आणि आंबेडकर अनुयायी तसेच विचारस्वातंत्र्य प्रतिष्ठान प्रतिष्ठान वेळे कामठी तालुका जिल्हा सातारा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

___________________________________
फोटो दरवर्षी आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन व अल्पोहर साहित्य वाटप करताना कुमारी दीक्षा पवार व अरुण पवार ( छाया- अजित जगताप सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button