मायणी:-श्री दिलीप दाभाडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
श्री दिलीप दाभाडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार मायणी प्रतिनिधी___खटाव तालुक्यातील मायणी मंडलाचे कृषी अधिकारी दिलीप हनुमंत दाभाडे हे 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा नागरी सत्कार औंध येथील साई मंगल कार्यालयात नुकताच घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा सांगली विधानसभेची माजी आमदार प्रभाकर घार्गे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खटाव तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर तसेच माजी सभापती शिवाजीराव सरोगोड तसेच खटाव तालुका पंचायत समितीचे मा.सभापती संदीप मांडवे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभ मुख्याध्यापिका सौ कल्पना मोहिते यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून श्री दिलीप दाभाडे यांनी गेल्या 37 वर्षाच्या सेवाकाळात केलेल्या कार्याचा आढावा घेतला यानंतर श्री दिलीप दाभाडे व त्यांच्या पत्नी सुनीता दाभाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. यानंतर झालेल्या भाषणात श्री दिलीप पुस्तके शिवाजी सर्वगोड यांनी श्री दिलीप दाभाडे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या नंतर झालेल्या भाषणात राहुल जीतकर यांनी सांगितले की शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दाभाडे साहेबांनी खूप कष्ट केली शेतकरी माझा प्राण आहे या तत्त्वाने ते आयुष्यभर वागले त्यांच्याजवळ जे काही होतं ते त्यांनी शेतकऱ्याला दिलं म्हणून आज त्यांचा एवढा मोठा सत्कार होत आहे अध्यक्ष भाषणात प्रभाकर घाडगे यांनी सांगितले की खटाव तालुक्यात शेती उत्पन्नाची चांगली वाढ होऊ लागली आहे उसाचे क्षेत्र वाढले आहे त्याबरोबर सोयाबीनचे क्षेत्र ही वाढलेले आहे परंतु या तालुक्यात सोयाबीन प्लांट नाही आता लवकरात लवकर आम्ही सोयाबीन प्लांट उभारणार असून त्यासाठी जिल्हा बँक मदत करणार आहेत पण दाभाडे साहेबांनी या सेवानिवृत्तीच्या काळात सोयाबीन प्लांट चे व्यवस्थापन करावे असे सांगितले सत्कारमूर्ती दिलीप दाभाडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की चांगले काम केल्याने लोक आपणाला जवळ घेतात मी आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हिताचे काम केले या भागातील शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले या प्रयत्नाचे फळ मला मिळाले आहे या पुढील काळातही मी शेतकऱ्याच्या बांधावर जाणार आहे असे सांगितले त्या कार्यक्रमास जयंत देशमुख अमृतराव देशमुख राजाराम देशमुख दिनकर शिंगाडे सरपंच करशिंगे दीपक नलावडे सरपंच औंध इलाही पटवेकरी रवींद्र घार्गे राजाराम घार्गे सचिन लोंढे पुसेगाव अक्षय सावंत औंध राजेंद्र नाळे वडूज श्रीमती सुरेखा पवार मायनी श्रीकृष्ण माने मायनी किरण काळे पुसेगाव सौरभ दाभाडे तसेच दाभाडे कुटुंबीयांचे सर्व नातेवाईक उपस्थित होते शेवटी शुभम डोंबे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले