आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-स्वयंभू दत्त मंदिर खामगाव फलटण येथे दत्त जयंती महोत्सव उत्साहात संपन्न.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

स्वयंभू दत्त मंदिर खामगाव फलटण येथे दत्त जयंती महोत्सव उत्साहात संपन्न.

मायणी प्रतिनिधी__स्वयंभू दत्त मंदिर खामगाव फलटण येथे महंत उमेशानंद सरस्वती महाराज यांच्या पुढाकाराने दत्त जयंती महोत्सव उत्साहात व थाटात संपन्न झाला. दिनांक 19 डिसेंबर रोजी या उत्सवास प्रारंभ झाला या दिवशी गुरुचरित्र पारायण प्रारंभ नवचंडी याग होम हवन इत्यादी धार्मिक कार्यक्रमाबरोबर स्वामी समर्थ भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला दिनांक 21 रोजी दुपारी बारा वाजता दत्तभक्त प्रिया मालवणकर यांचे दत्त चरित्र व उपासना या विषयावर व्याख्यान झाले त्यांनी दत्ताची सोळा रुपे कशी आहेत याची वर्णन केले दिनांक 22 रोजी दहा वाजता सत्यदत्त महापूजा व स्वामी समर्थ भजनी मंडळ कार्यक्रम पार पडला तसेच दिनांक 23 रोजी दत्तयाग होम हवन तसेच इंचगिरी भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला दिनांक 24 रोजी सत्यनारायण महापूजा व गणेश खराडे महाराज यांचे कीर्तन कार्यक्रम पार पडला पंचवीस रोजी सायंकाळी दत्त महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून गाडगे महाराज शाळेपर्यंत सडा रांगोळी घालून मिरवणूक काढण्यात आली दिनांक 26 रोजी पहाटे अभिषेक, गो, स्वान ,अश्व ,पृथ्वी पूजन करण्यात आले सायंकाळी सहा वाजता दत्त जन्मोत्सव कार्यक्रम श्रद्धेने व मोठ्या भक्ती भावाने पार पडला यावेळी पाळणा कार्यक्रम झाला यावेळी भक्तांची अलोट गर्दी झाली होती याच दिवशी सकाळी चे सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी कार्यक्रम पार पडला रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस ब्लॅंकेट, जर्किन, इस्त्री इत्यादी वस्तू भेट देण्यात आल्या जवळपास शंभर व्यक्तीने रक्तदान केले तसेच नेत्र तपासणी मोफत चष्मा वाटप कार्यक्रम ही पार पडला या कार्यक्रमात 70 नेत्र रुग्णांनी भाग घेतला दत्त जन्म सोहळ्याच्या वेळी दत्त महाराज की जय, अवधूत चिंतन गुरुदेव दत्त ,जन्मोत्सव पार पडला या कार्यक्रमास हजारो भाविकांनी हजेरी लावून दर्शन घेतले शेवटच्या दिवशी दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या स्वयंभू दत्त मंदिर सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी योग्य नियोजन व्यवस्थापन केल्याने दत्त जयंती महोत्सव उत्साहात घाटात संपन्न झाला.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button