चिपळूण:-चिपळूण शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी रोहन नलावडे
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
चिपळूण शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी रोहन नलावडे
चिपळूण : शहरातील बहादूर शेख नाका परिसरात राहणारे युवक कार्यकर्ते रोहन नलावडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या चिपळूण शहर युवक उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र नुकतेच युवकचे शहराध्यक्ष श्रीनाथ खेडेकर यांनी दिले आहे.याप्रसंगी माजी आमदार रमेश भाई कदम,माजी नगराध्यक्ष सूचय अण्णा रेडीज, सतीश आप्पा खेडेकर, शिरीष काटकर, महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, हिंदुरावशेठ पवार,गणपत काळे,राजू पवार,सर्जेराव कलकुतकी,धनाजी पवार, गणेश पवार,तुषार धोत्रे, प्रतिक पाथरवत, निवास जाधव, अक्षय पवार, पवन काळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच यावेळी चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य म्हणून सुनील कलकुटकी ,सहसचिवपदी अंकुश गणपत पवार यांची , शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सहखजिनदारपदी शशिकांत कुऱ्हाडे यांची देखील नियुक्तीपत्र देऊन नेमणूक करण्यात आली.
रोहन नलावडे हे युवा कार्यकर्ते म्हणून अनेक सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये हिरारीने सहभाग घेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन पक्ष वाढीसाठी त्यांचे असणारे प्रयत्न, युवकांसाठी राबवित असलेले निरनिराळे उपक्रम तसेच पक्षीय कामकाजाची दखल घेऊन त्यांच्यावर ही पक्ष संघटना वाढविणे तसेच युवकांसाठी उपक्रम राबवणे यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. सदरचे निवडीला आपण सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही रोहन नलावडे यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे चिपळूण शहरातून अभिनंदन करण्यात येत आहे.