पुणे-चिंचवड:-RPS स्टार न्यूजचा दणका- 48 तासांमध्ये “पीसीएमसी”ची धडक कारवाई.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
RPS स्टार न्यूजचा दणका-
48 तासांमध्ये “पीसीएमसी”ची धडक कारवाई.
पुणे, चिंचवड, दि. 24 (शफिक शेख):- ‘‘चिंचवडमधील कायनेटिक कंपनीसमोर मोठया प्रमाणात पडलेल्या कच-यामुळे आग लागण्याची शक्यता” या मथळयाखाली दि. 22/8/2022 रोजी आमच्या पोर्टलवर बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याची पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेने त्वरित दखल घेत 48 तासांच्या आत आपली कार्यक्षमता दाखवित धडक कारवाई करून संपूर्ण कचरा सा्फ करून राडारोडाही दूर केला.
या बाबतीत आमचे प्रतिनिधी शफिक शेख यांनी नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारीनुसार दि. 22/8/2022 रोजी सदर ठिकाणी पाहणी करून त्याचे वृत्त दिले होते त्यास न्याय देत आमचे मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण यांनी त्वरित बातमी प्रसिद्ध केली होती.
त्याची दखल घेत ही कारवाई करून नागरिकांच्या जिवितास आणि येथील कारखानदारांच्या मालमत्तेस होणारे नुकसान टाळले. या कामात या विभागाचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर श्री. अक्षय भोसले यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत सदर कारवाई पूर्ण केली.