कोरेगाव:-श्री गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भाषण स्पर्धा संपन्न.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
श्री गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भाषण स्पर्धा संपन्न.
आज 2 ऑक्टोबर रोजी आमच्या आश्रमशाळेत अहिंसेचे पुरस्कर्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. दीपक माने सर होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली.
विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने भाषणे केली.
उपशिक्षक श्री. सूर्यकांत गेजगे सर यांनी महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.
प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. दीपक माने सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महात्मा गांधीजी यांच्या विचारांची आणि लालबहादूर शास्त्री यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे असे सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.महेशकुमार बोभाटे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर श्री. संतोष जाधव सर, श्री. रविंद्रनाथ मोहिते सर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रमेश घोलप सर यांनी केले आणि आभार श्रीमती सरिता सावंत यांनी मानले.