वाई:-ओझर्डे येथे श्रावणी सोमवार निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
ओझर्डे येथे श्रावणी सोमवार निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
वाई प्रतिनिधी
ओझर्डे ( ता.वाई ) येथील कृष्णा नदी काठावरील श्रीक्षेत्र सोनेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवार दि.२२ रोजी पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन सोनेश्वर सेवेकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. नवनाथांमधील मच्छिंद्रनाथांनी कृष्णामाईच्या डोहात टाकलेल्या सोन्याच्या विटेवरून या स्थानाला सोनेश्वर हे नाव पडले. सोनेश्वर येथे पाच पुरातन साधूंची समाधी आहे सद्गुरु नारायण महाराजांची प्रेरणा व सोनेश्वर सेवेकरी मंडळाच्या माध्यमातून येथे नित्य नियमाने आरती, पूजा, प्रत्येक सोमवारी अभिषेक केला जातो त्रिपुरारी पौर्णिमेला कृष्णामाईला दीपदान व श्रावण व चातुर्मासात गुरुचरित्र पारायण केले जाते. श्रावणातील शेवटचा सोमवार येथे येणाऱ्या भक्तांच्यासाठी मोठी पर्वणीच असते पंचक्रोशीतील पालख्या व देवदेवता कृष्णामाईत स्नान करण्यासाठी येतात.यावेळी भाविक पारंपारिक ढोल व लेझीम चे डाव खेळताना दिसून येतात. देवाच्या पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, मिठाई, खेळणी यांची विक्री करणारे विक्रेते येतात. अन्नदानाचे हे सलग १८ वे वर्ष आहे तसेच प्रत्येक सोमवारी अन्नदानाचे हे १५ वे वर्ष आहे.२०२१ साली संपूर्ण ओझर्डे पंचक्रोशीच्या सहभागातून पाच लाखाचे पेवर ब्लॉक बसवण्याचे काम मंदिर परिसरात झाले. सोमवारी पहाटे अभिषेक, नंतर ९:३० वाजता ध्वजपूजन व आरती, १० ते सायंकाळ ८ पर्यंत महाप्रसाद असे नियोजन करण्यात आले आहे. ओझर्डे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन भाविकांच्या साठी करण्यात आलेले आहे. या महाप्रसादासाठी ओझर्डे गावातील घरोघरी जाऊन सेवेकरी माधूकरी मागतात या मिळालेल्या धान्यातून महाप्रसाद केला जातो. तीर्थयात्रा, पाल्य – पालक शिबिर, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार असे अनेक उपक्रम सेवेकरी मंडळाकडून राबविले जातात.