फलटण:-गिरवी परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ वासरावर हल्ला,भितीचे वातावरण.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
गिरवी परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ वासरावर हल्ला,भितीचे वातावरण.

फलटण (गिरवी):- फलटण तालुक्यातील वारुगड किल्ला पायथ्याशी असलेल्या गिरवी गावातील व परिसरातील बिबट्याच्या हल्ल्यात जाधववाडा नजिकच्या चव्हाण वस्तीत बिबट्याच्या हल्ल्यात गाईच्या वासराचा मृत्यू झाला आहे.तर सुतार मळवी,गिरवी शिवारात बिबट्या रात्री अपरात्री व कधी कधी दिवसाढवळ्या रानात शेतात भक्ष्य पकडण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत.त्यामुळे गिरवी ग्रामपंचायतीने ग्राम सुरक्षा यंत्रणांनी तातडीने काल रात्री भ्रमणध्वनीवर संदेश पाठवले.
गिरवी भागात व परिसरातील बिबट्याच्या हल्ल्यात गाईच्या वासराचा मृत्यू झाल्याने दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन करणारे शेतकरी, महिला व नागरिकांच्यात घबराट पसरली आहे.
गिरवी ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी सोमवार दिनांक ०६/१०/२०२५ रोजी तहसीलदार व वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन बिबट्या जेरबंद करण्यासाठी गिरवी ग्रामपंचायत वतीने लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
शेतकऱ्यांनी शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा सुरु करावा अशी मागणी केली आहे.रात्री अपरात्री बिबट्या शेतात शिवारात फिरत असल्याने शेतकऱ्यांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.
गिरवी भागात व परिसरातील बिबट्या,तरस व रानडुक्कर यांचा सुळसुळाट झाला असल्याने शेतातील पिकांचे नुकसान होत आहे.तरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गिरवी गावातील व परिसरातील रानटी जनावरांचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.




