ताज्या घडामोडी
मायणी:-एस टी महामंडळ मंडळातील नोकरी अभिमानास्पद : सीमा लगड.
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
एस टी महामंडळ मंडळातील नोकरी अभिमानास्पद : सीमा लगड.
मायणीत महिला एसटी चालकांचा सत्कार
मायणी : प्रतिनिधी. —–महिलांसाठी एस टी महामंडळातील नोकरी अतिशय सुरक्षित असून अभिमानास्पद आहे. महामंडळाने महिलांसाठी वाहक चालक यासह कार्यालयीन नोकऱ्या उपलब्ध केल्या आहेत त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या क्षेत्रात यावे असे आव्हान बारामती एसटी आगाराच्या चालक व शिरूर येथील रहिवासी सीमा किशोर लगड यांनी केले.
खटाव तालुक्यातील मायणी येथील बस स्थानकावर प्रथमच बारामती आगाराची बारामती सांगली ही एसटी बस महिला चालक घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते महेश जाधव,संदीप कुंभार,विशाल चव्हाण मिलिंद महामुनी गणेश गुरव सुनील भिसे विशाल माळी अशोक माळी दत्तात्रय निकम सचिन देशमुख मायणी बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रण राक्षे साहेब आधी उपस्थित होते.