ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमधील विद्यार्थ्यांकडून ग्रामस्वच्छता.

प्रतिनिधी संतोष बोंगाळे कराड:- 9923900840

वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमधील विद्यार्थ्यांकडून ग्रामस्वच्छता.

कराड (रविवार, दि. 14 ऑगस्ट 2022)
आजादी का अमृत महोत्सव व भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड मधील वरिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी स्वयंसेवकांनी मौजे वडोली निळेश्वर, ता. कराड येथे रविवार, दि. 14 ऑगस्ट, 2022 रोजी ग्रामस्वच्छता  केली. तसेच वडोली निळेश्वर येथील हनुमान मंदिर परिसरामध्ये स्वच्छता करून 15 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या ध्वजारोहण समारंभासाठी तयारी करण्यास वडोली निळेश्वर ग्रामपंचायत यांना मदत केली.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी स्वयंसेवकांनी रस्ता सफाई, त्याचबरोबर वडोली निळेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्र या परिसरामध्ये स्वच्छता केली. प्लास्टिक कचरा गोळा केला व या परिसरातील तण काढले.
हे ग्राम स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्था विद्यानगर कराडच्या उच्च शिक्षण मंडळ विद्यानगर कराडचे जनरल सेक्रेटरी मा. श्री प्रकाश पाटील (बापू ) व ग्रामपंचायत, वडोली निळेश्वर यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य सहकार्य लाभले. या ग्राम स्वच्छता अभियानामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेमधील विद्यार्थी स्वयंसेवक – स्वयंसेविका, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.जी. जाधव, कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. पी. पवार, प्रा. श्रीमती एस. पी. पाटील, शिक्षकेत्तर कर्मचारी
श्री ढमाले, श्री गुरव, वडोली निळेश्वरचे सरपंच मा. श्री भीमराव मदने, उपसरपंच सौ. सुरेखा पवार, श्री. संभाजी पवार, श्री अविनाश डुबल,  सोमनाथ दादा पवार मित्र मंडळ व वडोली निळेश्वरचे ग्रामस्थ उस्फूर्तपणे सहभागी झाले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button