फलटण :-कुरवली बुद्रूक गावचे सैनिक श्री बिपिन ज्ञानदेव सुळ यांच्या हातून ध्वजारोहण संपन्न.
प्रतिनिधी समीरखान पठाण फलटण :-9766685375

कुरवली बुद्रूक गावचे सैनिक श्री बिपिन ज्ञानदेव सुळ यांच्या हातून ध्वजारोहण संपन्न.
फलटण प्रतिनिधी / समीर पठाण
13 ते 15 ऑगस्ट या काळात आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत.स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत असल्याच्या अनुषंगाने प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज उभारण्याचे आहे.आपल्या भारताचे सैनिक आपल्या देशासाठी जिवाची बाजी लावत असतात. आज आपण आपल्या घरात सुखाने राहत आहोत ते भारतीय जवान यांच्या कारणांमुळे , या वेळी कुरवली गावांमध्ये आपल्या गावाचे सैनिक यांनी ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी शाळा, जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी दिनांक 13/08/2022 रोजी आपल्या गावचे सैनिक श्री बिपिन ज्ञानदेव सुळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी शैक्षणिक, सामाजिक , राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते . तसेच दिनांक 14 /8/ 2022 रोजी आपले ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री महेश सुरेश पवार यांचे हस्ते ध्वजवंदन होणार आहे तसेच दिनांक 15/ 8/ 2022 रोजी आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच सौ राणी अनंतकुमार सुळ यांचे हस्ते ध्वजवंदन होणार आहे. व आपल्या गावातील आडागळे वस्ती येथील अमृत सरोवर येथे आपल्या गावचे माजी सैनिक श्री गंगाराम संभाजी आढाव यांचे हस्ते ध्वजवंदन होणार आहे .