सातारा :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर- शिरवळ,वेळे,वाई येथे जल्लोषात स्वागत.
संपादक प्रल्हाद चव्हाण संपर्क :-8208717483

सातारा दि :-11/08/2022
वाई :-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा जिल्ह्यात जल्लोषात स्वागत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस सातारा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. शिरवळ येथे जिल्हा वास यांनी जोरदार स्वागत केले. मुख्यमंत्री हे दरे, तालुका महाबळेश्वर येथील त्यांच्या मूळ गावी येत आहेत. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर प्रथमच ते त्यांच्या मूळ गावी जात आहेत. आज मुख्यमंत्री गावी जाणार असल्याने त्यापूर्वीच त्यांचे जिल्हा वाशिम तर्फे स्वागत व्हावे यासाठी शिरवळ येथे आमदार शंभूरा देसाई शिंदे गटातील शिवसैनिकांनी गर्दी केली होती. मुख्यमंत्री शिरवळला पोहोचताच कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या साह्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. यावेळी समर्थकांनी त्यांना शाही पगडी घालून त्यांचा सन्मान केला. मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतर माय भूमी मध्ये पहिलाच दौरा असल्याने वाई तालुक्यात नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. सायंकाळी पाच वाजता वाई शहराच्या प्रवेशद्वारावर सह्याद्री नगर नाक्यावर कला गार्डन स्नॅक्स समोर सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यकर्त्यांनी स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या गाडीला गराडा घातल्यामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. यावेळी केलेल्या सत्काराने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे भारावून गेले. वाईकरांनी केलेले जल्लोषात स्वागत स्वीकारून आमदार शिंदे महाबळेश्वरच्या दिशेने रवाना झाले. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव , तहसीलदार रणजीत भोसले, श्री किरण कुमार मोरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे,उपनिरीक्षक कृष्णा पवार, प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजयताई भोसले आणि इतर मान्यवर लोकांनी मुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत केले.