आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-श्री शिवाजी विद्यालयात स्व. यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कराड:-श्री शिवाजी विद्यालयात स्व. यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी.

कराड :- श्री शिवाजी विद्यालय, कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे प्रा. केशव शंकर महाले (मराठी विभाग, वेणूताई चव्हाण महाविद्यालय, कराड) यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. टी. डी. जाधव यांनी केले. यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कार्याचा आढावा घेतला. तसेच त्यांनी लिहिलेल्या बारा गीतांपैकी ‘यशवंत गौरव गीत’ सादर करून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची ओळख करून दिली.
प्रमुख पाहुणे प्रा. महाले यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनातील विविध प्रसंग व प्रेरणादायी आठवणी सांगितल्या. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी समाजातील गोरगरीब व वंचित घटकांच्या विकासासाठी केलेले कार्य, वाचनाची आवड, साहित्यप्रेम, साधेपणा आणि लोकहिताची भूमिका यांचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आणि गुणांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी इयत्ता सातवीतील चि. प्रणिल दुपटे याने तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. चि. सरताज शेख, चि. प्रणित प्रजापती, चि. मोहम्मद अली मुल्ला आणि चि. यशराज शिंदे या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. आर. एस. पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन चि. संस्कार भंडारे याने केले, तर आभार प्रदर्शन चि. श्रावण मोरे याने केले.
यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा व कार्याचा परिचय करून देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button