कराड:-स्वर्गीय शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला, कराड येथे “राष्ट्रीय गणित दिन” उत्साहात साजरा.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS
स्वर्गीय शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला, कराड येथे “राष्ट्रीय गणित दिन” उत्साहात साजरा.
कराड- स्वर्गीय शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला, कराड येथे थोर भारतीय गणिती तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा हा जन्मदिन भारताचे भूतपूर्व पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंग यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या गणितातील योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून घोषित केला. प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही विविध उपक्रमाने हा दिवस साजरा करण्यात आला याचे नियोजन गणित विभाग प्रमुख बाळासाहेब देसाई सर यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक मोहन पाटील सर आणि शिक्षण मंडळ कराडच्या व्हाईस चेअरमन अनघा परांडकर होत्या. यानिमित्ताने विद्यार्थिनींनी तयार केलेल्या भित्तिपत्रकांची उद्घाटन करण्यात आले, तसेच विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या गणिती मॉडेल्स या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आणि विद्यार्थिनी स्वनिर्मितीतून घेतलेला आनंद हा मोठा असतो तसेच यशाच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ वाढवायचे असेल तर कष्टाच्या त्रिज्येची लांबी वाढवावी लागते असे पाहुण्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाविषयी त्यांनी शिक्षकांना धन्यवाद दिले.कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका जंगम मॅडम यांनी केले, आभार विकास पाटील सर यांनी मांडले सूत्रसंचालन काकडे मॅडम यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नांगरे मॅडम, माळी मॅडम, पाटील मॅडम यांचे सहकार्य लाभले..