फलटण :-साखरवाडीच्या विकासाला शिलेदार कोण ?
प्रतिनिधी :-शुभंम भापकर फलटण:-7972521412

साखरवाडीच्या विकासाला शिलेदार कोण ?
फलटण प्रतिनिधी. शुभम भापकर
साखरवाडी बाजारपेठ मानाचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे बाजारपेठ यामध्ये प्रचंड उत्साह इलेक्शन ची जिल्हा परिषद पंचायत समिती सुरू झाल्यामुळे लोकांमध्ये एकच चर्चा चालू आहे यामध्ये प्रामुख्याने साखरवाडीच्या विकासाचे शिलेदार म्हणून कोण होणार सध्या साखरवाडी मध्ये एकच विषय पाण्यात खड्डे कि खड्ड्यात पाणी साखरवाडी एसटी स्टँड परिसर पाण्याचे तळे साचल्यामुळे लोकांचे हाल होतात जनतेतून नाराजीचे सूर पाहायला मिळत आहे यामुळे विकासाचे शिलेदार कोण ठरणार असे नागरीकांच्या बोलण्यातून येत आहे. साखरवाडी मध्ये शाळेमधील विद्यार्थी शाळेत जात असताना त्यांना चालत जायचं कसे हे समजत नाही गाडी चालक विद्यार्थी कडे लक्ष न देता त्याच्या अंगावर चिखल उठवुण जात असलेले दिसत आहे तरी विकासाचा प्रश्न सोडवणार कोण असा प्रश्न ग्रामस्थांच्या बोलण्यातून येत आहे तरी साखरवाडीच्या जवळपास 8 ते 10 लहान मोठा गावातून ग्रामस्थ गावामध्ये येत असताना साखरवाडीत यावे का नको का खड्यात पडावं असा प्रश्न उभा राहत आहे त्यामुळे दुकानंदाराचे व व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे कोणत्याही नेत्यांनी विकासाचा मार्ग मोकळा करावा असे ग्रामस्थांकडून बोलण्यात येत आहे.