पिंपरी येथे माननीय सागर दादा पवार यांच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले.
प्रतिनिधी:-अशितोष चव्हाण:-8208717483

पिंपरी येथे माननीय सागर दादा पवार यांच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले.
पिंपरी येथील ग्रामस्थ यांचे स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी भारतीय मराठा महासंघ प्रदेश उपाध्यक्ष माननीय सागर दादा पवार यांनी आपल्या ग्रामस्थांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिर ठेवण्यात आले यावेळी आणि आजूबाजूच्या परिसरातील समस्त ग्रामस्थांनी या शिबिराला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला
शिबिरासाठी येणाऱ्या ग्रामस्थांनी सागर दादांचे अभिनंदन केले आणि भविष्यात ग्रामस्थांसाठी आणि वयोवृद्ध साठी अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवावे भविष्यात आमच्या हिताचे निर्णय घेणारा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सागर दादा पवार यांच्याकडे पाहतो यांचे कार्य फक्त गावापुरते मर्यादित नसून समस्त महाराष्ट्रासाठी हे कार्य करतात तरी दादांनी ग्रामस्थ म्हणून असे उपक्रम प्रत्येक गावात राबवावे असे बोलत दादांचे अभिनंदन केले
या उपक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आणि उद्घाटक मा. सभापती कोरेगाव बाजार समिती अशोक पवार साहेब व सागर दादा पवार माननीय चेअरमन यशवंतराव चव्हाण. सोमनाथ शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व मान्यवर व डॉक्टर्स यांची टीम यांचेही स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित युवराज पवार, सचिन पवार, ज्ञानेश्वर गुंजवटे,निहाल इनामदार, संदिप पवार, दयानंद सोनवले, सचिन सोनवले, रोहित पवार,किरण सगरे व ग्रामस्थ ,महिला उपस्थित होते.