आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त वाईत रक्तदानाचा प्रेरणादायी महायज्ञ; काशिनाथ शेलारांचे सलग ६२ वे रक्तदान ठरले आकर्षण.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त वाईत रक्तदानाचा प्रेरणादायी महायज्ञ; काशिनाथ शेलारांचे सलग ६२ वे रक्तदान ठरले आकर्षण.

सातारा | वाई दि. २३ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त वाई शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रेरणादायी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विकासकामे आणि लोककल्याणकारी योजना अधिक व्यापक व्हाव्यात, तसेच त्यांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी उपस्थितांनी सदिच्छा व्यक्त केल्या.
या उपक्रमाला माजी आमदार मदन भोसले, लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत, उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के, विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे, पंचायत समिती सदस्या सुरभी भोसले, जितेंद्र पिसाळ यांच्यासह नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराचे प्रमुख आकर्षण ठरले ते समाजसेवक काशिनाथ शेलार यांचे सलग ६२ वे रक्तदान. त्यांच्या सातत्यपूर्ण रक्तदानाच्या सेवेमुळे उपस्थितांना प्रेरणा मिळाली आणि “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचला.
रक्तसंकलनाची जबाबदारी वाईतील बेल एअर संस्थेने समर्थपणे पार पाडली. वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाचे शहरभर कौतुक होत असून, सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श या निमित्ताने वाईकरांनी घालून दिला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button