वाई:-अतिक्रमण काढल्याशिवाय आता माघार नाय, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रणित मोरे यांचा धोम पाटबंधारे विभागला इशारा.!
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 82087174833

वाई:-अतिक्रमण काढल्याशिवाय आता माघार नाय, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रणित मोरे यांचा धोम पाटबंधारे विभागला इशारा.!

प्रतिनिधी -नित्यानंद मोरे
सातारा वाई.
धोम पाटबंधारे विभागाची जागा म्हणजे आवो – जावो घर तुम्हारा असं झाला आहे. सामान्य नागरिकांना धोम पाटबंधारे विभागाने मध्यंतरी बऱ्याचशा नोटीस बजावल्या त्यांना कारवाईची धमकी दिली. आता मात्र एका वाई तालुक्यातील अधिकाऱ्यानेच धोम पाटबंधारे विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून मी बांधेल तेवढी हद्द असा हुकूमनामा केल्याचे दिसून येते. परंतु अशा मस्तवाल हुकूमनांना वाईकर जनता आणि वाईतील सुज्ञ जागरूक नागरिक अजिबात जुमानणार नाहीत. या उलट आता अतिक्रमण निघाल्याशिवाय माघार नाही. धोम पाटबंधारे विभागाची यावर जरी संकुचित व अकार्यक्षम भूमिका दिसत असली तरी मात्र आता संयमाचा अंत पाटबंधारे विभाग पहात आहे. अतिक्रमण करणे ते ही शासकीय जागेवर फौजदारी गुन्हा आहे आणि आता या विषयात माघार नाही धोम पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी त्यांची जमीन मोकळी करून घ्यावी नाहीतर, खुर्ची सोडावी असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांनी दिला आहे.




