आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुसेसावळी:-(खटाव)-कळंबी जिल्हा परिषद शाळेच्या प्रतिकात्मक आषाढी दिंडीतुन समाजप्रबोधन.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
कळंबी जिल्हा परिषद शाळेच्या प्रतिकात्मक आषाढी दिंडीतुन समाजप्रबोधन.

पुसेसावळी( खटाव ):- कळंबी येथील जिल्हा परिषद शाळा यांनी अनोखा उपक्रम राबवून एक नवा आदर्श घालून दिला आहे.पांडुरंगाची आस लागून सर्व वैष्णव भक्त पंढरीकडे जात असताना केंद्र शाळा कळंबीच्या लहानग्यांनी तंबाखू मुक्त शाळा, तंबाखूमुक्त गाव, एक पेड माँ के नाम, जल हैं तो कल हैं,व्यसनमुक्ती तरुण अशा घोषणा देत आषाढी वारीतून समाजप्रबोधन करत राम कृष्ण हरिचा जयघोष करीत प्रतिकात्मक आषाढी वारी काढून लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला.
परिसरातील एक उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक असलेली कळंबीची शाळा असे विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सर्वांगीण विकासाबरोबर मूल्य शिक्षण व समाज जागृतीचे काम करत असते… आषाढी वारीचे औचित्य साधून आपल्या धार्मिकसंकल्पना, संत महात्मे यांच्या कार्यातून केलेल्या समाजप्रबोधन डोळ्यासमोर ठेवून शाळेतील सर्व बालकांनी तंबाखू चे दुष्परिणाम, वृक्ष लागवडीचे महत्व, व्यसनमुक्त समाजाची गरज यावर दिंडीतून प्रबोधन केले.
विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम ज्ञानेश्वर भालदार चोपदार यांच्या वेशभूषा केलेल्या बालवारकऱ्यांचे ठिकठिकाणी औक्षण केले गावातील स्त्रिया ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन दिंडीत सामील झाले.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य, वारकरी सांप्रदायचे लोक, मुख्याध्यापक, व शिक्षक वृंद उपस्थित होते. ग्रामप्रदक्षिणा करून महाआरतीने या दिंडीची सांगता झाली.





