आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-मराठी विश्वकोश अर्थशास्त्र नोंदलेखन कार्यशाळा दिमाखात संपन्न.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

मराठी विश्वकोश अर्थशास्त्र नोंदलेखन कार्यशाळा दिमाखात संपन्न.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, पुणे आणि गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी विश्वकोश अर्थशास्त्र नोंदलेखन कार्यशाळा ३० जानेवारी २०२६ रोजी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ पुणे येथे यशस्वीपणे पार पडली.

सदर कार्यशाळेस अध्यक्ष म्हणून एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व संचालक चेतना, पुण्याचे डॉ. महेश कोलतमे; प्रमुख पाहुणे डॉ. संतोष दास्ताने; प्रमुख मार्गदर्शक डॉ. मनोज गायकवाड; मराठी विश्वकोशाचे विद्याव्यासंगी सहायक संतोष ग्या. गेडाम; कृषी विभाग मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवाधिकारी डॉ. मंगेश गोंदवले; गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. राजेश दनाने आणि अर्थशास्र विभाग प्रमुख, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ डॉ. सुभाष पाटील उपस्थित होते.

कार्यशाळेच्या प्रास्ताविकेत डॉ. सुभाष पाटील यांनी मराठी विश्वकोश हा ज्ञानाचा ठेवा असून त्याचा वापर सर्वांनी अधिकाधिक प्रमाणात करावा आणि विश्वकोशात नोंदलेखक म्हणून योगदान द्यावे, असे म्हणाले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. कोलतमे म्हणाले, आजच्या कृत्रिम बुद्धिमतेच्या युगातही विश्वकोशाने आपले स्थान अबाधित ठेवले आहे; कारण हे अधिकृत संकेतस्थळ आहे. ज्यावरून मिळणारी माहिती ही त्या त्या विषयातील तज्ज्ञ मंडळींनी लिहिलेली असते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संतोष दास्ताने म्हणाले, विश्वकोश निर्मिती मंडळ करत असलेले कार्य खूप मोलाचे आहे. आज एका क्लिकवर तुम्हाला विश्वकोशामधील विविध विषयांतील माहिती सहज उपलब्ध होते. नवीन तंत्रज्ञानांच्या साह्याने केवळ महाराष्ट्रातच नाही, तर आज जागतिक स्तरावर विश्वकोशाला स्थान प्राप्त झाले आहे.

संतोष गेडाम यांनी नोंद कशा पद्धतीने लिहावी, त्याची रचना कशी असावी, कोणते महत्त्वाचे मुद्दे त्यात असावे इत्यादीचे तपशीलवार सादरीकरण पॉवर पॉईंटच्या साह्याने केले. ज्यामुळे लेखकांना नोंद लेखनाविषयक माहिती अगदी सोप्या व सविस्तरपणे मिळाली.

डॉ. मनोज गायकवाड यांनी मराठी विश्वकोशाची माहिती संपूर्ण मराठी भाषकांपर्यंत, तसेच आदिवासी विद्यार्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठी विश्वकोशाद्वारे ‘मराठी विश्वकोश परिचय परीक्षा’ हा उपक्रम शहादा येथे राबविल्याचे सांगून तो उपक्रम या वर्षी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात यावा, अशी विनंतीवजा सूचना केली.

कार्यशाळेच्या शेवटी विश्वकोशासंदर्भात, नोंदलेखना संदर्भात मुक्त चर्चासत्र ठेवण्यात येऊन उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

कार्यशाळेसाठी मुंबई, पुणे, नंदूरबार, सातारा, सांगली, नाशिक, ठाणे, चिपळूण, नांदेड इत्यादी जिल्ह्यांतून अर्थशास्त्र विषयातील सुमारे १०० हून अधिक प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित सर्वांना कार्यशाळेच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन लेखिका व भाषांतरकार डॉ. रिता मदनलाल शेटीया यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. अविनाश कुलकर्णी यांनी केले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक वर्ग आणि विद्यावाचस्पती विद्यार्थिनीचे मोलाचे सहकार्य लाभले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button