सातारा:-नागठाणे येथील मातंग वस्तीसाठी नवीन सांस्कृतिक भवनाच्या उभारणीची मागणी; बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना निवेदन.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-नागठाणे येथील मातंग वस्तीसाठी नवीन सांस्कृतिक भवनाच्या उभारणीची मागणी; बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना निवेदन.

सातारा : -नागठाणे येथील मातंग वस्तीमधील शासकीय जागेवर असलेले जुने समाजमंदिर अत्यंत जीर्ण अवस्थेत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याच जागेवर नवीन, सुसज्ज सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे, अशी मागणी मातंग वस्तीतील श्री.गुलाब मोहिते, श्री.जगन्नाथ मोहिते, श्री.सयाजी मोहिते, श्री.राजेंद्र मोहिते, श्री.संजय मोहिते श्री.लालासो मोहिते, दादा बंडु मोहिते,प्रकाश मोहिते,अनिकेत मोहिते, स्वप्नील मोहिते व ग्रामस्थ यांनी केली आहे.
या मागणीसंदर्भात राज्याचे बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, सध्या असलेले समाजमंदिर मोडकळीस आले असून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ते अपुरे व धोकादायक ठरत आहे.
त्यामुळे त्याच शासकीय जागेवर सर्व सोयी-सुविधांनी युक्त नवीन सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे, जेणेकरून मातंग समाजातील नागरिकांना सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होईल, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी निवेदन स्वीकारून संबंधित विभागामार्फत या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.
मातंग समाजाच्या विकासासाठी आणि सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी नवीन सांस्कृतिक भवन उभारण्याची मागणी आता प्रशासनाकडून कितपत लवकर पूर्ण होते, याकडे नागठाणे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




