लोहगाव :-बाभळेश्वर चौकात खड्ड्यांचे साम्राज्य.
प्रतिनिधी:- कोंडीराम नेहे अहमदनगर :-7507469042

लोहगाव ( वार्ताहर ) वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणाऱ्या नगर मनमाड रोड वरील बाभळेश्वर गावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बाभळेश्वर गावातून नगर- मनमाड तसेच नाशिक -औरंगाबाद हा महामार्ग जात असल्यामुळे या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी व मालवाहतूक होते तसेच शिर्डीला येणारे व शनिशिंगणापूरला येणाऱ्या साई भक्त व शनी भक्तांचा याच मार्गावरून प्रवास होतो. त्यामुळे बाभळेश्वर चौकात कायमच मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते . बाभळेश्वर चौकातच बस स्थानक असल्यामुळे या ठिकाणावरून दररोज मोठ्या प्रमाणात बस वाहतूक चालू असते.
गेल्या आठवड्यामध्ये बाभळेश्वर मध्ये चार ते पाच पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे बाभळेश्वर चौकातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चारही रोडला मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे . वाहनधारकांना वाहन चालवताना अक्षरशा जीव मुठीत धरून आपले वाहन चालवीत वाट काढावी लागते. बराच वेळा एक खड्डा चुकविताना परत गाडी दुसऱ्या खड्ड्यात आदळली जाते. खड्ड्यांमुळे वाहनाचे बऱ्याच वेळा नुकसान झालेले आहे खड्डा चुकवण्याच्या नादामध्ये बऱ्याच वेळा चौकात लहान-मोठे अपघात सुद्धा झालेले आहे. एकंदरीत बाभळेश्वर चौकाची अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी झालेली आहे. आम्ही शासनाला मोठ्या प्रमाणात रोड टॅक्स देतो तरी अशा प्रकारे आम्हाला खड्ड्यातून प्रवास करावा लागतो असे वाहनधारक बोलून दाखवतात. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर बाभळेश्वर चौकातील चारही रोडचे खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणी बाभळेश्वर ग्रामस्थ व वाहनधारकांनी केली आहे.